कोल्हापूर : रेसकोर्स नाक्यावर सशस्त्र हल्ला | पुढारी

कोल्हापूर : रेसकोर्स नाक्यावर सशस्त्र हल्ला

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पूर्ववैमनस्यातून संभाजीनगर रेसकोर्स नाका येथे दोघांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला. वैभव शहाजी कुरणे व खंडू अशोक माने (रा. वारे वसाहत) हे सोमवारी रात्री झालेल्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. याप्रकरणी 10 जणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडा चौगुले, सौरभ लोखंडे, विश्वजित चौगुले, गजानन गणाचार्य, सागर चौगुले, संजय आवळे, पृथ्वी आवळे, विलास आवळे, सरदार आवळे, निवास आवळे (सर्व रा. वारे वसाहत परिसर) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. फिर्यादी खंडू माने सोमवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास त्याचा मित्र वैभव कुरणेसोबत रेसकोर्स नाका येथील पानपट्टीजवळ थांबला होता. यावेळी संशयित बंडा चौगुले आणि त्याचे साथीदार त्याठिकाणी आले. पूर्वीच्या वादातून चौगुले याने हातातील एडक्याने वैभव कुरणेच्या हातावर वार केला तसेच इतर साथीदारांनी कुरणे व खंडू माने या दोघांना हॉकी स्टिक व काठ्यांनी मारहाण सुरू केली. विलास आवळे याने हातातील चाकूने पोटात वार केल्याचेही जखमीने जबाबात म्हटले आहे. याप्रकरणी एका संशयिताला मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. तर इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.

Back to top button