कोल्हापूर : पर्यटक, भाविकांची तुडुंब गर्दी | पुढारी

कोल्हापूर : पर्यटक, भाविकांची तुडुंब गर्दी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

चार-पाच दिवस सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक, भाविक मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली होती. जोतिबाच्या यात्रेमुळे दख्खनचा राजा जोतिबा डोंगरावर आणि करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

शुक्रवारी देवीचा वार असल्याने आणि जोतिबाचे दर्शन घेऊन गुलालात माखलेले हजारो भाविक अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येत होते. यामुळे गर्दी अधिकच वाढली होती. मंदिरातून सरलष्कर भवन, जुना राजवाडा अशी लांब रांग लागली होती. जुना राजवाड्यातील मोकळ्या जागेत ही रांग फिरविण्यात आली होती. पार्किंग तळ भरल्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुतर्फा पर्यटकांची वाहने पार्क करण्यात आली होती.

Back to top button