राजाराम बंधारा पाण्याची पातळी ४८ फुटांवर, ७६ बंधारे पाण्याखाली | पुढारी

राजाराम बंधारा पाण्याची पातळी ४८ फुटांवर, ७६ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राजाराम बंधारा पाणी पातळी ४८ फूट ४ इंच इतकी आहे. एकुण पाण्याखाली गेलेले बंधाऱ्यांची संख्या ७६ आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पावतळी – ४३ फूट आहे. राजाराम बंधारा पाण्याच्या पातळी ही आकडेवारी साेमवार (दि.२६) दुपारी १:०० वाजताची आहे.

राजाराम बंधारा पाण्याची पातळी ४८ फूट १० इंच इतकी आहे. एकूण ७८ बंधारे पाण्याखाली (दि. २६) आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूरकडून देण्यात आलेली आहे. राजाराम बंधारा पाण्याच्या पातळी ही आकडेवारी साेमवार (दि.२६) सकाळी ८:०० वाजताची आहे.

तर पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट आहे. तर धोका पातळी ४३ फूट आहे.

राधानगरी धरण पूर्ण भरले

राधानगरी धरण पूर्ण भरले

राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजा उघडला, ८,५९४ क्युसेक्स विसर्ग

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. दरम्यान, काल रात्री ११ वाजता राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजा उघडला. तसेच, धरणातून ८,५९४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अधिक वाचा- 

राधानगरी धरण क्षेत्रात आत्तापर्यंत एकूण २८२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेट क्रं. ३,४,५,६,७ प्रत्येक द्वारातून १,४२८ क्युसेक्स प्रमाणे एकूण ७,१४० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, रविवारी (दि. २५) दुपारी राधानगरी धरण पूर्ण भरले. रविवारी सायंकाळी सातवाजेपर्यंत धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार खुले झाले होते. यात ३, ४, ५, ६ क्रमांकाच्या दरवाजांचा समावेश होता.

अधिक वाचा – 

राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. यामुळे भोगावतीसह पंचगंगा नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चार-पाच दिवस कोल्हापूर शहर व जिल्ह्यात हाहाकार माजवलेल्या मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली आहे. पण, अजूनही काही भागात पुराचा वेढा कायम आहे.

अधिक वाचा –

जिल्ह्यातील ३६६ गावे अजूनही पूरबाधित आहेत. सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पंचगंगा नदीने विक्रमी ५६ फूट तीन इंच पाणी पातळी गाठली आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर जलमय बनले आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता

पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक सकाळी दहानंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

तावडे हॉटेल ते सांगली फाटा या दरम्यानच्या महामार्गावर अजूनही दीड फूट पाण्याची पातळी आहे.

शिरोळमध्ये कृष्णा, पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा या प्रमुख नद्यांवरील धरणांतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे.

शिरोळ तालुक्यात ४३ गावांना महापुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत ५२ हजार पेक्षा जास्त पूरग्रस्तांचे स्थलांतर झाले आहे.
महापुरामुळे शेतीवाडीसह घरादारे पाण्याखाली गेल्याने पूरग्रस्तांच्या मनात हुरहूर लागली आहे.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा | Flood Rescue Operation

Back to top button