landslide : सातारा जिल्ह्यात दरड कोसळून २३ लोक बेपत्ता | पुढारी

landslide : सातारा जिल्ह्यात दरड कोसळून २३ लोक बेपत्ता

पाटण : पुढारी वृत्तसेवा : कामरगाव, कोयनानगरमध्येही landslide झाली आहे. तालुक्यातील २३ लोक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. दरम्यान राज्यातील डोंगराळ भागात landslide बहुतेक ठिकाणी झाले आहे.

मागील दोन दिवसांपासून मुसळधार अतिवृष्टी सुरू असल्याने कोयना विभागात दरड कोसळण्याचे प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणावर जिवित तसेच वित्त हानी झाली आहे.

मिरगाव, हुबरळी व ढोकावळे या गावात ङ्गमाळीणफची पुनरावृत्ती झाली असून २३ लोक बेपत्ता झाले आहेत.

हुंबरळी येथे एका महिलेचा मृतदेह सापडला असून शोध कार्य सुरूच आहे.

कोयनानगर विभागात मुसळधार पावसाने रौद्ररूप

मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाचे माहेरघर असणार्‍या कोयनानगर विभागात मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले आहे.

कोयना विभागातील मिरगाव, हुंबरळी, कामरगाव, ढोकावळे, कोयनानगर येथे भूस्खलन होऊन दरडी कोसळल्याने मोठया प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे.

मिरगाव येथील १५ ग्रामस्थ, हुंबरळी येथील ३ तर ढोकावळे येथील ५ ग्रामस्थ अशी २३ लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेत ५ लोक जखमी आहेत.

कोयना विभागात मुसळधार पावसाचा जोर कायमच असून ठिकठिकाणी रस्त्यावर दरड, झाडे कोसल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
त्यामुळे मदतकार्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दोन दिवसापासून कोयना विभागात मुसळधार पडणार्‍या पावसाचा जोर चौपट झाल्याने कोयना विभागात हाहाःकार माजला आहे.

कोयना विभागातील कामरगाव परिसरातील धबधबा परिसरात भूस्खलन झाले आहे.

त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणार्‍या ७ मोटारसायकलींसह ४ चारचाकी वाहने गाडली गेली आहेत.

नवजा रोडवर असणार्‍या मिरगाव या गावात केतकीच्या पाण्याजवळ वास्तव्य करणार्‍या ७ कुटूंबाला भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. या ७ कुटूंबातील १२ लोक यात गाडली गेली असल्याची भीती व्यक्त होत आहे.

यातील एका १० वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह सापडला आहे. तर हुंबरळी येथे मुसळधार पावसाने २ घरे गाडली गेली आहेत.

या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह सापडला आहे.

भूस्खलनामुळे बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोधासाठी कराड होऊन एनडीआरएफचे पथक दाखल झाले. स्थानिक प्रशासनाकडून बेपत्ता झालेल्या अन्य लोकांचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा : 

हे ही पाहा 

Back to top button