Kirit Somaiya on Anil Parab : अनिल परब यांनी कोर्टाची फसवणूक केली : किरीट सोमय्या | पुढारी

Kirit Somaiya on Anil Parab : अनिल परब यांनी कोर्टाची फसवणूक केली : किरीट सोमय्या

दापोली, पुढारी वृत्तसेवा : अनिल परब, आणि सदानंद कदम बनवाबनवेगिरी करत आहेत. रिसोर्टचे तोडकाम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. तिसरा मजला पूर्ण पाडायचा आहे. मात्र, अनिल परब यांनी पुन्हा एकदा कोर्टाची फसवणूक केली आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (दि.८) केला आहे. सोमय्या दापोलीत पत्रकारांशी बोलत होते. Kirit Somaiya on Anil Parab

ते म्हणाले की, रिसॉर्टला परमिशन ५०० स्क्वेअर मीटरची आहे. तळमजला आणि पहिला मजला यासाठी ही परवानगी आहे. परंतु, मागील ६ वर्ष, आधी ३ वर्षे अनिल परब आणि नंतर सदानंद कदम घरपट्टी भरत आहेत. ४० हजार स्क्वेअर फूट बांधकामावर अनिल परब घरपट्टी भरत आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस चौकशीत हे सर्व मुद्दे आणावे लागणार आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले.
४ एफआयआर पैकी काहीवर चार्जशीट दाखल झाल्या आहेत, आणखी काहीवर दाखल होतील आणि अनिल परब यांच्यावर कारवाई होईल, असा दावा देखील सोमय्या यांनी यावेळी केला. Kirit Somaiya on Anil Parab

यावेळी सोमय्या यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांची घेतली भेट दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यावर एफआयआर दाखल केला होता, त्याबाबत चौकशी करण्यासाठी सोमय्या दापोलीत आले होते. पुढच्या तीन महिन्यांत अनिल परब यांच्यावर चार खटल्यात कारवाई सुरू होईल, असे सोमय्या यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button