राज्यात ‘हम करे सो कायदा’ : राज ठाकरे | पुढारी

राज्यात ‘हम करे सो कायदा’ : राज ठाकरे

दापोली; पुढारी वृत्तसेवा :  दोन -तीन वर्षे निवडणुका प्रलंबित राहत आहेत. या वर मात्र कुणी बोलत नाहीत. नुसती चालढकल सुरू आहे. राज्यात सर्वत्र ‘हम करेसो कायदा’ अशी स्थिती आहे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारबाबत नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे हे कोकण दौर्‍यावर असताना त्यांनी दि. 14 रोजी दापोली येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही टीका केली.

दापोली दौर्‍यात ठाकरे म्हणाले की, लोकांनी आता जागरूक राहिले पाहिजे. निवडणुकीच्या आधी एकाशी युती आणि निवडणुकीत दुसर्‍याशी अशी प्रतारणा नागरिकांशी मी करणार नाही आणि असे जर झाले तर महाराष्ट्राला भवितव्य उरणार नाही, असे देखील राज ठाकरे म्हणाले. दर महिन्याला कार्यशाळा सुरू असतील. सांगितलेली कामे पदाधिकारी हे चोखपणे करतात की नाही, यावर पदाधिकार्‍यांना पदावर ठेवायचे की नाही ते ठरवले जाईल, असे शेवटी राज ठाकरे यांनी सांगितले.

Back to top button