सिंधुदुर्ग, रत्नागिरीत ५३ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी | पुढारी

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत ५३ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात 53 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत थकबाकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 6836 ग्राहकांकडे 24 कोटी 50 लाख, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 80 हजार 223 ग्राहकांकडे 29 कोटी 5 लाख थकबाकी शिल्लक आहे. वीज बिल वसुलीतून जमा होणार्‍या महसुलावर महावितरणची भिस्त आहे. शंभर टक्के थकीत वीज बिल वसुलीशिवाय पर्याय नसल्याने या वसुलीचे उद्दिष्ट साध्य करावे, अशा सक्त सूचना सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीत दिल्या, अशी माहिती महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी दिली.

महावितरणची रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील आढावा बैठक नुकतीच रत्नागिरी येथे झाली. मुख्य अभियंता विजय भटकर, अधीक्षक अभियंता नितीन पळसुले-देसाई, विनोद पाटील, कार्यक्षेत्रातील संबंधित कार्यकारी अभियंता व स्थानिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महावितरणच्या थकबाकी, अचूक वीजबिले यावर विशेष चर्चा करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती 86 हजार ग्राहक, 6 कोटी 44 लाख थकीत, वाणिज्य 8 हजार 863 ग्राहक 2 कोटी 43 लाख थकीत, औद्योगिक 804 ग्राहक 76 लाख थकीत, कृषी 5 हजार 67 ग्राहक 97 लाख थकीत, कृषी इतर 1 हजार 285 ग्राहक 63 लाख थकीत, पथदिवे 1 हजार 561 ग्राहक 10 कोटी 33 लाख थकीत, पाणीपुरवठा 942 ग्राहक 1 कोटी 81 लाख थकीत, सार्वजनिक सेवा 2293 ग्राहक 1 कोटी 11 लाख वीज बिल थकीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 1 लाख 6836 ग्राहकांचे 24 कोटी 50 लाख रु. ची वीज बिल थकबाकी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरगुती 57 हजार 162 ग्राहक 3 कोटी 97 लाख थकीत, वाणिज्य 5 हजार 05 ग्राहक 1 कोटी 25 लाख थकीत, औद्योगिक 578 ग्राहक 62 लाख थकीत, कृषी 11 हजार 804 ग्राहक 2 कोटी 49 लाख थकीत, कृषी इतर 253 ग्राहक 10 लाख थकीत, पथदिवे 2 हजार 423 ग्राहक, 17 कोटी 14 लाख थकीत, पाणीपुरवठा 1 हजार 70 ग्राहक 2 कोटी 74 लाख थकीत, सार्वजनिक सेवा 1 हजार 929 ग्राहक 74 लाख वीज बिल थकीत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 80 हजार 223 ग्राहक असून 29 कोटी 5 लाखांचे वीजबिल थकबाकी आहे. या थकबाकीकडे लक्ष देण्याबाबत सक्त सूचना या बैठकीत देण्यात आल्या. वीज ग्राहकांनी वीज बिले नियमित भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button