रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील आणखी सहा गाड्या विजेवर धावणार | पुढारी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील आणखी सहा गाड्या विजेवर धावणार

खेड शहर : पुढारी वृत्तसेवा ;  कोकण रेल्वे मार्गावर आणखी ६ रेल्वेगाड्या डिझेल इंजिनऐवजी विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नियमितपणे धावणाऱ्या दिवा सावंतवाडी एक्स्प्रेससह अन्य ५ साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यामुळे विद्युत इंजिनावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या २९ वर पोहचणार आहे.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार १२२२३ / १२३२४ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस- एर्नाकुलम द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून धावू लागली असून परतीच्या प्रवासात १५ फेब्रुवारीपासून विद्युत इंजिनासह धावू लागली आहे. २२१५०/२२१४९ क्रमांकाची पुणे – एर्नाकुलम एक्स्प्रेस १५ फेब्रुवारीपासून विद्युतशक्तीवर धावू लागली. ११०९९/१११०० क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस १८ फेब्रुवारीपासून विजेवर धावणार आहे. १२१३३/१२१३४ क्रमांकाची नियमितपणे धावणारी सीएसएमटी मुंबई- मंगळूरु नियमित एक्स्प्रेस १६ फेब्रुवारीपासून, तर परतीच्या प्रवासात १७ फेब्रुवारीपासून विद्युतशक्तीवर धावणार आहे.

१०१०५/१०१०६ क्रमांकाची दिवा- सावंतवाडी नियमित एक्स्प्रेस १२ फेब्रुवारीपासून तर परतीच्या प्रवासात दि. १३ फेब्रुवारीपासून विद्युत इंजिनासह धावत आहे. ५०१०७/५०१०८ क्रमांकाची सावंतवाडी-मडगाव नियमित एक्स्प्रेस १३ फेब्रुवारीपासून विजेवर धावू लागली आहे.

Back to top button