केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, तळिये दुर्घटनेतील बाधितांना पीएम आवासमधून घरे | पुढारी

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, तळिये दुर्घटनेतील बाधितांना पीएम आवासमधून घरे

मुंबई, पुढारी ऑनलाईन : तळिये दुर्घटनेतील बाधितांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून देण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज कोकणचा दौरा सुरू केला आहे.

अधिक वाचा

ते म्हणाले, ‘नैसर्गिक आपत्ती मधून लोकांना सोडवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करू, शासकीय यंत्रणेत कोणतीही कचुराई राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

या बाधितांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र प्रांताधिकारी नेमण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. बाधितांना घरे बांधून देण्यात येणार असून पंतप्रधानांच्या आदेशानुसार कोकणातील आपत्तीचा अहवाल सादर करणार आहे.

केंद्राकडून पाठविण्यात आलेली एनडीआरएफची तुकडी कायमस्वरुपी कोकणात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’

‘ही राजकारण करण्याची वेळ नाही’

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ही आपत्ती नैसर्गीक आहे आता कोणावर टीका करण्याची वेळ नाही. टीका करण्यापेक्षा आता या लोकांना मदतीची गरज आहे.

केंद्र सरकार मदत करणार आहेच त्याबराबेर राज्य सरकारही मदत करेल. प्रवीण दरेकर लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरात आले.त्यांनी पाहणी केली. मात्र, ही टीका करण्याची वेळ नाही.

ही यंत्रणा सांभाळणे खूप अवघड आहे एनडीआरएफचे काम कौतुकास्पद, कोकणात ज्या ठिकाणी बाधित क्षेत्रे आहेत त्यांना केंद्राकडून मदत लवकरच मिळणार आहे.

नारायण राणे यांना मोदींनी केंद्राकडून आपत्तीचा आढावा घेण्यासाठी पाठवले आहे.’

कोकणात उडालेल्या हाहाकाराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कोकण दौरा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने राणेंचा कोकण दौरा होत आहे.

राणे यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत.

अधिक वाचा

राणे कोकणच्या दौऱ्यावर जाताना  आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने कोकणच्या दौऱ्यावर आलो आहोत असे ट्विट केले आहे.

त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित आहेत.

राणे आज तळीये, चिपळूण या परिसराची पाहणी करणार आहेत.

अधिक वाचा

काय म्हणाले राणे

‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने मी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळीये,

रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत.’ असं ट्विट नारायण राणेंनी केलं आहे.

हेही वाचले का:

पहा व्हिडिओ: पूर ओसरत आहे, काळजी घ्या….

 

Back to top button