पालघर : पालम तालुक्यात विषारी वायूमुळे दोन बालकांचा मृत्यू | पुढारी

पालघर : पालम तालुक्यात विषारी वायूमुळे दोन बालकांचा मृत्यू

पालम ; पुढारी वृत्तसेवा : हळदीच्या ढिगाऱ्याला कीड लागू नये म्हणून खाेलीत विषारी गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. त्याचा विषारी वायू नाकात गेल्याने गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू झाला. ही घटना पालम तालुक्यातील आडगाव येथे घडली. विषारी वायू ने झालेल्या मुलांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त हाेत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आडगाव येथील डॉ. ब्याळे यांच्या शेतात वाटेकरी असलेल्या शेतमजुराचे कुटुंब राहत होते.

कुटुंब राहत असलेल्‍या खोलीत लगतच खोलीत हळदीच्या पिकाचा ढिगारा होता.

अधिक वाचा 

खोली बंद असल्याने विषारी वायू पसरला

या ढिगाऱ्याला कीड लागू नये म्हणून विषारी गोळ्या ठेवून ही खोली बंद करण्यात आली होती.

मात्र या खोलीतून विषारी वायू वाटेकरी शेतमजुराचे कुटुंब राहत असलेल्या खोलीत पसरला.

या खोलीत शेताचे वाटेकरी असलेले भीमराव सदाशिव कुगणे आपल्या पत्नी व दोन मुलांसह रात्री झोपले होते. झोपेत हा विषारी वायू खोलीभर पसरला.

अधिक वाचा 

यावेळी त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा कन्हैया व दीड वर्षाची मुलगी ज्योती या दोघांना त्रास सुरू झाल्यानंतर ते उठले. त्याच वेळी खोलीत विषारी वायू पसरल्याचे आणि त्यामुळेच श्वास गुदमरत असल्याचे भीमराव यांच्या लक्षात आले.

श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत असल्याने गुदमरून ज्योती व कन्हैया हे अस्वस्थ झाले.

भीमराव व त्यांच्या पत्नीलाही श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.

अधिक वाचा 

ही बाब शेजाऱ्यांना कळाल्यानंतर या चौघांनाही नांदेड येथे उपचारार्थ नेण्‍यात आले; पण त्‍यापूर्वीच ज्योती व कन्हैया यांचा मृत्यू झाला हाेता.

भीमराव व त्यांच्या पत्नीवर नांदेड येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ : काेल्‍हापूर : रंकाळा ओव्‍हरप्‍लाे

 

Back to top button