

पुढारी ऑनलाईन डेस्क : टोकियो ऑलिम्पिकमध्ये टेनिसमध्ये सानिया मिर्झा – अंकिता रैना जोडीचे प्रदर्शन निराशाजनक झाले. पहिल्याच सामन्यात सानिया मिर्झा – अंकिता रैनाने यांचा पराभव झाला. यामुळे महिला दुहेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
अधिक वाचा
सानिया -अंकिताने पहिला सेट ०-६ असा जिंकला. पहिल्या सेट जिंकल्यानंतर सानिया-अंकिता यांच्या जोडीने दुसर्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडीही घेतली. यूक्रेनची लिडमय आणि नादिया किचनोक यांनी झुंजार खेळी करत सलग दोन सेट जिंकत ०-६, ७-६, १०-८, असा सामना आपल्या बाजूने फिरवला. पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्याने सानिया मिर्झा-अंकिता रैना जोडीचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.
अधिक वाचा
पीव्ही सिंधूने विजयी सलामी देत शानदार सुरुवात केली आहे.
सिंधूने अवघ्या २८ मिनिटांत इस्राईलच्या सेनियाचा 21-7, 21-10 अशा गेममध्ये पराभव करून विजय प्राप्त केला.
टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी शनिवारी भारताची सुरुवात दिमाखदार झाली. ४९ किला वजनी गटात तिने रौप्यपदकाला गवसणी घातली.
ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिप्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली.
भारताला मीराबाई चानूमुळे स्पधेर्धेच्या पहिल्याच दिवशी पदकावर माेहर उमटवता आली. तिच्या यशामुळे अन्य खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे.