हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पादुका अलंकापुरीत | पुढारी

हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पादुका अलंकापुरीत

आळंदी; पुढारी वृत्तसेवा : ज्ञानोबा माऊली तुकाराम…विठ्ठल विठ्ठल चा गजर करत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका अलंकापुरी म्हणजेच आळंदीत शनिवारी दाखल झाल्या. माऊलींच्या पादुका पंढरपुरातून परत येण्याआधी गोपाळकाल्याचा सोहळा झाला.

कोरोना महामारीमुळे यंदाची पंढरपुरातील आषाढी यात्रा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत  झाली.

अधिक वाचा:

कोरोना संसर्गाचा धोका असल्याने सरकारनेही संकट असल्याने माऊलींची पालखी एसटी बसने पंढरपूरला नेली.

फुलांनी सजविलेल्या शिवशाही बसचे पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसह भाविकांनी जोरदार स्वागत केले.

अनेक ठिकाणी फुलांचा, भंडाऱ्याचा वर्षाव करत माऊलींचे दर्शन घेतले.

अधिक वाचा:

आषाढी सोहळा संपल्यानंतर माऊलींच्या पादुका पौर्णिमेला गोपाळकाला करून परतीच्या मार्गावर होत्या.

शनिवारी (दि.२४) रोजी पंढरपूरातुन निरोप घेतल्या नंतर रात्री साडे दहाच्या सुमारास आळंदीत पालखी दाखल झाली.

आळंदी पंढरीची वारी करुन श्रींचे पादुका महाद्वारातून कारंज्या मंडपात हरीनाम गजरात आणण्यात आल्या.यावेळी फुलांच्या व रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या.

अधिक वाचा:

मोजक्याच ४० वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सोहळा वारी करुन परतला आळंदीत माऊलींच्या स्वागतासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली होती.

दशमी पर्यत श्रींचे पादुका कारंजा मंडपातच राहणार आहेत.यावेळी पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे-पाटील, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, योगेश देसाई,

मालक राजाभाऊ आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.

आळंदीत रस्त्याचे दुर्तफा नागरिक भाविकांनी श्रींचे स्वागतास गर्दी केली होती.

 

हेही वाचले का: 

पहा व्हिडिओ: पाणी ओसरतेय…

 

Back to top button