जालना : नळणी येथे कारची दुचाकीला धडक, एक ठार | पुढारी

जालना : नळणी येथे कारची दुचाकीला धडक, एक ठार

भोकरदन : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नळणी खु. गावात दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १ गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना  शनिवारी (दि.१४) सायंकाळी नळणी खु.गावातील मुख्य रस्त्यावर घडली. अपघातात जखमी लोकशाहीर जनार्धन शेषराव वराडे (वय ५०, रा. नळणी खु., ता. भोकरदन, जि. जालना) यांचा उपचार सुरू असताना आज ( दि. १५ ) पहाटे औरंगाबाद येथे मृत्यू झाला. जखमी विजय लक्ष्मण सरोदे याच्यावर सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नळणी खु. येथे जनार्धन वराडे हे विजय सरोदे यांना शेतात सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते.  तडेगाव येथून भरधाव येणाऱ्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली.   जनार्धन वराडे, विजय सरोदे गंभीर जखमी झाले. ग्रामस्‍थांनी त्‍यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी नेले. जनार्धन वराडे यांचा उपचार सुरू असताना आज (दि.१५) पहाटे मृत्यू झाला.

वराडे यांच्या नातेवाईकांनी मृत्यूदेह घेऊन भोकरदन पोलीस ठाणे गाठले. कार चालकाला अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांना घेतली. दोन तास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. अखैर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वराडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.दरम्यान, भोकरदन पोलीस ठाण्यात कमलकर शेषराव वराडे यांच्या फिर्यादीवर चालक विशाल धनसिंग घुसिंगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :  

Back to top button