दैव बलवत्तर म्हणून टळला अनर्थ! सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट (VIDEO)

दैव बलवत्तर म्हणून टळला अनर्थ! सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट (VIDEO)

पुणे; पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील एका कार्यक्रमावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेठ घेतला. तात्काळ घेतलेल्या खबरदारीमुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने त्यांना या घटनेत कोणतीही इजा झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करत असताना तिथे असलेल्या दिव्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागलयाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हिंजवडीमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला त्या पुष्पहार अर्पण करत होत्या. त्यावेळी तिथे असलेल्या दिव्यामुळे त्यांच्या साडीला अचानक आग लागली.

दरम्यान उपस्थित असणाऱ्या एका कार्यकर्त्याने साडीला आग लागल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी तात्काळ साडीला लागलेली आग वीजवण्यात आली. मात्र सुदैवाने या घटनेमध्ये सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नसून त्या पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाल्या आहेत. नशीब बलवत्तर होते म्हणून मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news