औरंगाबाद : एसटीच्या चार्जिंग सेंटरचे काम वेगात | पुढारी

औरंगाबाद : एसटीच्या चार्जिंग सेंटरचे काम वेगात

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद विभागातील बसच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. या बसच्या चार्जिंगसाठी उभारण्यात येत असलेल्या चार्जिंग सेंटरच्या कामाला वेग आला असून, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री नुकतीच दाखल झाली. केबल अंथरण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. दोन रोहित्र उभारणी पूर्णत्वाकडे जात असून, हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद विभागाला 50 इलेक्ट्रिक बस मिळणार असून, त्या औरंगाबाद-पुणे मार्गावर चालवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जुलैत काही बस औरंगाबादेत दाखल होणार होत्या, परंतु चार्जिंग सेंटर उभारणीला उशीर लागल्याने अद्याप या बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या नाहीत. दरम्यान, चार्जिंग सेंटरसाठी लागणारी यंत्रसामग्री नुकतीच विभागीय कार्यालयाच्या परिसरात दाखल झाली आहे. गेल्या महिन्यातच इलेक्ट्रिक केबल अंथरण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ते पूर्ण झाले असून, चार्जिंग सेंटरसाठी लागणारे दोन रोहित्र या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
आता चार्जिंग सेंटरच्या यंत्रसामग्रीची जुळवाजुळव करून ती उभारणीचे काम वेगात सुरू आहे. हे काम पूर्ण होताच
ई-बस दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

4 बसचे चार्जिंग
येथे उभारण्यात येणार्‍या चार्जिंग सेंटरवर एका वेळेस चार बसची चार्जिंग करता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान, आवश्यकतेनुसार ही संख्या वाढूही शकते किंवा यात काही प्रमाणात बदलही होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Back to top button