कामकाजाच्या बळावर खासदार होणार : राणी लंके | पुढारी

कामकाजाच्या बळावर खासदार होणार : राणी लंके

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : जयघोषात 5 जेसीबीने फुलांची उधळण करत माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांचे राहुरीकरांनी जल्लोषात स्वागत केले. धार्मिकतेच्या नावाने भावनिक मते मागण्यापेक्षा लोकहिताच्या कामकाजाच्या बळावर खासदार होणार असल्याचा टोला विखेंचा नामोल्लेख टाळत लंके यांनी लगावला. शुक्रवारी राहुरीतील मल्हारवाडी चौकात शिवस्वराज्य यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी लंके यांच्यावर जेसीबींद्वारे कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली.

कुणी साखर वाटो, वा डाळ वाटो, आम्ही आमच्या कामांच्या जोरावर, लोकांच्या अडचणींच्या काळात पाठीशी नव्हे तर सोबत राहून मनामनापर्यंत पोहोचलो आहोत असे सांगत, आगामी लोकसभा निवडणूक लढवणारचं, असा ठाम निर्धार लंके यांनी व्यक्त केला. शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम लंके प्रतिष्ठान करीत आहे. पक्षाने आदेश दिल्यास आम्ही आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहोत. यासाठी आम्ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात घराघरापर्यंत पोहोचत असल्याचे लंके म्हणाल्या.

प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर तर सुत्रसंचालन अ‍ॅड. राहुल झावरे यांनी केले. यावेळी धनराज गाढे, मंगेश गाढे, संदिप आढाव, अमोल बेल्हेकर, बाळासाहेब जाधव, सुनिल कोकरे, भाऊसाहेब चौरे, हरिदास जाधव, नितीन भांबळ, आर. आर. राजदेव, गणेश आहेर, प्रवीण वारुळे, बाळासाहेब काळे, दत्तात्रय फुंडे, दत्तात्रय खताळ, राजू मकासरे, राहुल तमनर, सुनील औटी, अक्षय गडाख, तुषार वाळके, सुदर्शन पडवळ, गणेश घनदाट, परशराम हारदे, मनसुरी पिंजारी, मुजहीद पिंजारी, रशीद पिंजारी, अरिफ पिंजारी, सादिक पिंजारी, रहमान पिंजारी, डॉ. अनिल कदम उपस्थित होते. दरम्यान, राहुरी बस स्टॅन्ड जवळील आरपीआय आठवले गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या जनसंपर्क कार्यालयास राणी लंके यांनी भेट दिली. यावेळी रिपाईं उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रविण लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. अनिल पलघडमल, योगेश घाडगे, विधाते यावेळी उपस्थित होते.

आम्हाला निवडणूकीची कुठलीही भीती नाही

लंके म्हणाल्या, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या जनमानसात दिसत आहेत, मात्र आम्ही गेल्या अडीच वर्षांपासून जनसामान्यांशी जोडलो आहोत. आम्हाला निवडणुकीची कुठलीही भीती वाटत नसल्याचे सांगत लंके यांनी धनश्री विखे यांचे नाव न घेता टीका केली.

हेही वाचा

Back to top button