Nagar News : कोळगाव, पेडगाव, मढेवडगावात सत्तांतर | पुढारी

Nagar News : कोळगाव, पेडगाव, मढेवडगावात सत्तांतर

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये कोळगाव, पेडगाव, मढेवडगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. सुरुवातीला अधोरेवाडी, देवदैठण ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन तासांत मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

गावनिहाय विजयी सरपंच व सदस्य –

अधोरेवाडी – सरपंच – अजित लकडे. सदस्य – दत्तात्रय अधोरे, किरण लकडे, शुभांगी ढवळे, दत्तात्रय झुंजरूक, सुरेखा बिबे, अनिल अधोरे, कविता पुराणे.

विसापूर – सरपंच – रूपाली शिवाजी जठार. सदस्य – बन्सी शिंदे,मिना शिंदे ,रुपाली लगड, मनोज तिखुटे, सुभाष जठार , सुनीता जठार,बाळू काटे, महादेव भोसले, सायली गटणे.

देवदैठण – सरपंच – जयश्री विश्वास गुंजाळ. सदस्य – सचिन लोखंडे, वर्षा वाघमारे, अर्चना वाघमारे,दीपक कौठाळे, रेश्मा कौठाळे, सुनीता कोकाटे,तुषार वाघमारे, सुवर्णा ढवळे,नंदकुमार ओहोळ,वसंत बनकर, प्रियांका बनकर.

टाकळी लोणार – सरपंच – अर्चना दरवडे. सदस्य – गुलाब शेख, जयश्री खराडे, सुनील जगदाळे, सावित्राबाई मते, वैशाली कदम, संजय काळे, अजिनाथ मोरे, स्वाती शिंदे, दादा निकम, सुभाष शिंदे, रतन गोडसे

पेडगाव – सरपंच – इरफान अजमोद्दिन पिरजादे. सदस्य – अश्विनी भोसले, सुनीता ओगले, रेश्मा तांडेल, रामहरी तांडेल, प्रीतम पवार, योगिता गोधडे, युवराज शिंदे, नंदाबाई मोहिते, विनोद म्हस्के, सोनम पिरजादे, आयुब शेख, रिझवाना आतार, शारदा कंगणे.

मढेवडगाव – सरपंच – प्रमोद नामदेव शिंदे. सदस्य – योगेश शिंदे, अमृता ससाणे, सोनाली उंडे, राजकुमार उंडे, मंगल गोरे, सुनीता उंडे, अभयसिंह गुंड, रंजना गोरे, संतोष गायकवाड, रेश्मा शिंदे, राहुल साळवे, योगेश मांडे, सुरेखा फाफाळे.

आनंदवाडी – सरपंच – छाया सोपान ढमढेरे. सदस्य – नवनाथ भुजबळ, विठ्ठल गिरमकर, मंगल जाधव, संपत कोल्हटकर, वृषाली खरात, दयाराम खामकर, किसनाबाई खरात, सविता गिरमकर, रमेश गिरमकर, सारिका थोरात, सविता बर्डे.

कोळगाव – सरपंच – पुरुषोत्तम यशवंत लगड. सदस्य – निलेश काळे,अश्विनी काळे,मोनिका नलगे,नंदू लगड,अनिता तोंडे,अलका थोरात,स्वप्नील धस,निर्मला नलगे,विलास शितोळे, निखिल लगड, शीतल जगताप, महेंद्र रणसिंग, नीलेश बारहाते, माया मेहेत्रे, जयराज लगड, कमल आढाव, शोभा पवार.

लोणी व्यंकनाथ – सरपंच – मनीषा प्रवीणकुमार नाहाटा. सदस्य – रंजना म्हस्के, कल्पना काकडे, अशोक खेडकर, हनुमंत मगर, छाया साळवे, संतोष काकडे, सविता गायकवाड, नीलिमा थोरात, अजित काकडे, वर्षा गायकवाड, सुजाता जाधव, सविता नगरे, चंद्रकला पवार, पल्लवी गोरखे, दादा आल्हाट, बाटक्या काळे, तृप्ती काकडे.

कामठी पोटनिवडणूक – भाऊसाहेब मच्छिंद्र आरडे.

आम्ही अपक्ष : अजित लकडे

अधोरेवाडीचे नूतन सरपंच अजित लकडे म्हणाले, आम्ही आता तरी कोणत्या पक्षात नसून, आम्ही स्वतंत्र आघाडी तयार करून निवडणुकीला सामोरे गेलो होतो. आम्ही अपक्ष आहोत.

सर्वांची मदत : पुरूषोत्तम लगड
कोळगावचे नूतन सरपंच पुरूषोत्तम लगड म्हणाले, कोळगाव सारख्या मोठ्या गावचे सरपंच पद भूषविण्याची संधी मिळाली. पाचपुते-विखे यांनी तर मदत केलीच. त्याच बरोबर नागवडे गटानेही केलेली मदत महत्त्वाची ठरली.

हा विजय लोकांचा : मनीषा नाहाटा
लोणी व्यकनाथच्या नूतन सरपंच मनीषा नाहाटा म्हणाल्या, ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी केलेली मदत लाखमोलाची ठरली. आमचा पराभव व्हावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, लोकांच्या पाठबळावर आम्हाला यश मिळाले.

गावाचा विकासास प्राधान्य : पिरजादे
पेडगावचे नूतन सरपंच इरफान पिरजादे म्हणाले, अटीतटीच्या लढतीत पेडगावकरांनी माझ्या बाजूने कौल दिला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गावचा प्रथम नागरिक होण्याची संधी मिळाली. गावाच्या विकासास प्रथम प्राधान्य देणार आहे.

Back to top button