वाळकी : विक्रेत्यांना लुटणार्‍या दोघांना पकडले | पुढारी

वाळकी : विक्रेत्यांना लुटणार्‍या दोघांना पकडले

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अगरबत्ती व चिप्स विक्रेत्याला रस्त्यात अडवून चाकूने वार करत लुटणार्‍या दोघांना नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले. सागर अशोक वाळके (रा. लोणी सय्यदमीर, ता.आष्टी, जि. बीड) व शुभम ऊर्फ श्रीकेशर बंडू मोकळे (रा. वाटेफळ, ता.नगर) अशी त्यांची नावे आहेत. लूटमारीची ही घटना 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी नगर-सोलापूर महामार्गावर वाटेफळ शिवारात घडली होती.

त्या वेळी दोन्ही आरोपींच्या मारहाणीत सुशांत रमेश जंजिरे (वय 23, रा. हातवळण देवीचे, ता.नगर), संतोष पुंडलिक खिलारे (रा.येळेगाव तुकाराम, ता. कळंबोली, जि. हिंगोली), रमेश जंजिरे, मुकुंद जंजिरे (दोघे रा. हातवळण) हे चौघे जखमी झाले होते. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जंजिरे यांच्या फिर्यादीवरून भवानी पवार (पूर्ण नाव माहीत नाही), सागर वाळके, शुभम मोकळे व शुभम उर्फ बाबू दिलीप चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण तपास करत होते. त्यात पोलिस काँन्स्टेबल राजू खेडकर यांनी तांत्रिक विश्लेेषणाद्वारे वाळके व मोकळे हे अर्धपिंप्री (ता.गेवराई, जि.बीड) येथे असल्याची माहिती काढली. त्याद्वारे पोलिस पथकाने तेथे जाऊन दोघांना पकडले. सहायक फौजदार दिनकर घोरपडे, पोलिस हेडकाँस्टेबल सुभाष थोरात, कमलेश पाथरुट, विक्रांत भालसिंग, संभाजी बोराडे, विशाल टकले, मोबाईल सेलचे काँस्टेबल नितीन शिंदे, राहुल गुंडू यांनीही या कारवाईत भाग घेतला.

हेही वाचा

नेवासा : कांदा उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्या : आमदार गडाख

नाशिककरांनो काळजी घ्या! शहराभोवती वाढतोय डेंग्यूचा विळखा

Solapur | कांदा व्यापार्‍याची साडेचार कोटींची फसवणूक, केरळच्या दोन एजन्सीजवर गुन्हा

Back to top button