नगरमध्ये एलसीबी ‘इन अ‍ॅक्शन मोड’! | पुढारी

नगरमध्ये एलसीबी ‘इन अ‍ॅक्शन मोड’!

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील गुन्हेगार व गुन्हेगारी उखडून फेकण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी यंत्रणेला अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर धाडसत्र राबवत 204 गुन्हेगारांचे कबरडे मोडले आहे. एलसीबीने धडक कारवाई करत 156 दाखल गुन्ह्यांमध्ये दोन कोटी सात लाख 63 हजार 642 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा ही पोलिस दलाची सशक्त बॅ्रच. या पथकाचा (एलसीबी) सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मुक्त संचार असतो. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी एलसीबीचा कारभार हाती घेतल्यापासून कारवायांचा धडाका सुरू केला आहे.
जिल्ह्यातील दारू, जुगार, गुटखा, पानमसाला, रेशनिंग, गोवंश व वाळू अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाया करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एलसीबीच्या पथकाने महिनाभरात 156 गुन्हे गुन्हे दाखल करून दोन कोटी 7 लाख 63 हजार 642 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एलसीबी पथकाने जिल्हाभरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी मोठी मोहीम उघडली आहे. तसेच, गेल्या काही महिन्यांत घडलेल्या खून, जीवघेणे हल्ले, दरोडे, जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये ‘खाकी’ची दहशत पाहावयास मिळत आहे.
जुलैमधील कारवाया
गुन्हे             आरोपी        जप्त मुद्देमाल (रुपये)
दारुबंदी  93       95              60,75,236
जुगार    51       77                 6,87,380
गुटखा  8           19              26, 98, 526
रेशनिंग  2        7 1,              02,90,000
गोवंश  1          4 5              ,02,500
वाळू  1             2 5,             10,000
एकूण 156 204 2,07,63,642

Back to top button