नगर : ताजनापूरच्या पाण्यासाठी शेतकरी ठोकणार मुक्काम : हर्षदा काकडे | पुढारी

नगर : ताजनापूरच्या पाण्यासाठी शेतकरी ठोकणार मुक्काम : हर्षदा काकडे

नगर : पुढारी वृत्त्तसेवा :  जायकवाड धरणातील शेवगाव तालुक्याचे हक्काचे पाणी ताजनापूर लिप्ट1 योजनेतून मिळावे यासाठी 9 गावातील शेतकर्‍यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. हक्काचे पाणी मिळावे, अन्यथा क्रांतीदिनी 9 ऑगस्टला नऊ गावांच्या शेतकर्‍यांचा प्रदक्षिणा व मुक्काम ठोको आंदोलनाचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी दिला.
काकडे यांच्या नेतृत्वाखाली 9 गावातील शेतकर्‍यांनी मंगळवारी अधीक्षक अभियंता व प्रशासक शेटे बी.के. आणि कार्यकारी अधिकारी जगदीश मधुकर पाटील, कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली. वरूर खुर्द, वरूर बु,आखेगाव (डोंगर व तितर्फा ), थाटे, खरडगाव, वाडगाव, सालवडगाव, मुर्शदपूर, हसनापूर या गावांना पाणी मिळावे असा ठराव वाडगाव येथील बैठकीत करण्यात आला.

23 जानेवारी 2022 रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार जलसंपदा खात्याने प्रस्ताव सादर केला मात्र ताजनापूर लिफ्ट टप्पा 1 योजना बंद स्थित आहे. या योजनेचे 1.8 टी.एम.सी पाणी 9 गावांना देण्याबाबत अहमदनगरचे अधीक्षक अभियंता व प्रशासकांनी शासनाकडे सकारात्मक टिपणी सादर केलेली आहे. तथापि त्याला शासनस्तरावर मान्यता मिळालेली नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही हा प्रश्न उपेक्षित राहिलेला आहे.

जायकवाडी धरणात शेवगाव तालुक्याच्या हक्काचे पाणी 9 गावांना देण्याबाबतच्या प्रस्तावास त्वरित मंजुरी देऊन प्रकल्पाचे काम सुरु करावे या मागणीसाठी 9 ऑगस्टला 9 गावातील शेतकरी प्रदक्षिणा आणि मुक्काम आंदोलन करणार असल्याचे काकडे यांनी यावेळी सांगितले. लहू जायभाये, दादा सातपुते, बळीराम शिरसाठ, नवनाथ ढाकणे, विक्रम ढाकणे, शेषराव ढाकणे, अर्जुन खंडागळे, सरपंच सर्जेराव जवरे, महादेव जवरे, डॉ.अंकुश दराडे, माणिकराव म्हस्के, गणेश मोरे, कानिफनाथ उभेदळ, मच्छिंद्र वावरे, शिवाजी वावरे, उद्धव वावरे, अजिनाथ लांडे, नारायण टेकाळे, शिवाजी औटी, सकाहरी भापकर, बाप्पासाहेब लांडे, भगवान डावरे, भाऊसाहेब बोडखे, ज्ञानेश्वर बोडखे, राजेंद्र लोणकर, एकनाथ बोडखे, आदिनाथ धावणे, रंगनाथ ढाकणे, श्रीधर धावणे, बाबासाहेब ढाकणे, मुरलीधर धावणे, उपसरपंच अशोक गोर्डे, भगवान गोर्डे, पाराजी मराठे, राहुल पाबळे, अशोक कोल्हे यावेळी उपस्थित होते.

 

Back to top button