अहमदनगर शहरात अनधिकृत पत्राशेड @1400 | पुढारी

अहमदनगर शहरात अनधिकृत पत्राशेड @1400

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरातील पारिजात चौकातील अनाधिकृत पत्राशेडमधील दुकानांना आग लागल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. दरम्यान, अतिक्रमण विभागाने आतापर्यंत सुमारे 1400 गाळेधारकांना नोटिसा बजविल्या आहेत. त्यातील 12 जणांना अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राजकीय दबावापोटी कोणीही कारवाई करण्यास धजावत नाही, असे चित्र आहे. नगर शहरात सावेडी, बोल्हेगाव, नागापूर, केडगाव अशा विविध उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला अनाधिकृत पत्राशेड धारकांना दुकाने धाटली आहेत. काही दुकाने खासगी प्लॉटमध्ये तर काही दुकाने महापालिकेच्या जागेवर बेकायदेशीर रित्या उभारली आहेत. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधीचा कर बुढाला आहे.

मात्र, त्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. काही दिवसांपूर्वी आयुक्ती शहरातील अनाधिकृत पत्राशेड धारकांचा सर्वे केला होता. त्यात शहरात सुमारे 1400 अनाधिकृत पत्राशेडधारक असल्याचे निष्पन्न झाले. पाईपलाईन रस्त्यावरील अनाधिकृत पत्राशेड मनपाने हटविली होती. मात्र, त्या जागेवर पुन्हा पत्राशेड उभी राहिली आहेत. महापालिका अतिक्रमण विभागाने सुमारे 1400 पत्राशेड अतिक्रमणधारकांना नोटिसा काढल्या आहेत. अतिक्रमित पत्राशेड राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांची असल्याने अतिक्रमण विभागही थंडावला आहे. पारिजात चौकातील जळीतानंतर आयुक्त जावळे यांनी अतिक्रमण विभागाकडून अहवाल मागविला. अतिक्रमण विभागाने अतिक्रमण करणार्‍यांचा अहवाल आयुक्तांना दिला.

हेही वाचा

पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत; खा. सुप्रिया सुळे यांची पोलिस आयुक्तांशी चर्चा

पुण्यासह मुंबईत पुढील 72 तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता

दै.‘पुढारी’च्या पाठबळाने कोल्हापूर खंडपीठ स्थापनेचे शिवधनुष्य शक्य

Back to top button