पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत; खा. सुप्रिया सुळे यांची पोलिस आयुक्तांशी चर्चा

पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत; खा. सुप्रिया सुळे यांची पोलिस आयुक्तांशी चर्चा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोयता गँगमधील सराईत वाहनांची तोडफोड करून दहशत माजवत आहेत. वारजे भागात या गँगने राडा घातला. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. या भागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहमंत्र्यांनी आदेश द्यावेत, अशी मागणी खा. सुळे यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहर परिसरात नागरिकांच्या गाड्या फोडणे, धमकावून मारहाण करणे, दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत.

वारजे भागात कोयता गँगने दहशत माजवली आहे. दहशतीच्या घटनांची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. पुणे शहर व परिसरात वाढलेल्या गु्न्हेगारीवर वचक बसविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. गृहमंत्र्यांनी लक्ष घालून पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, असे सुळे यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news