राहुरी : वाळू वाहण्यास नकार दिल्याने मारहाण, धमकी | पुढारी

राहुरी : वाळू वाहण्यास नकार दिल्याने मारहाण, धमकी

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : वाळू उपसा करण्यास मज्जाव केल्याने वाळू तस्करांनी राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथील राजू कोरडे व त्यांच्या कुटुंबीयांना लाथा बुक्क्यांनी व दांड्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. 2 जून रोजी घडलीय. याबाबत राजू एकनाथ कोरडे ( वय 25) हे कोळेवाडी येथील त्याच्या शेतात व घरी येण्या जाण्यासाठी ओढ्यातून रस्ता आहे. त्या ओढ्यातून गंगाधर दिनकर कोरडे हे वाळू काढत असे. राजू कोरडे यांनी ओढ्यातून वाळू काढू नका. आमचा रस्ता बंद होईल.

त्यानंतरही त्यांनी वाळू उपसा सुरूच ठेवला. त्यामुळे कोरडे यांनी तहसीलदार यांना फोन करून सदर माहिती दिली. तहसीलदार यांनी छापा टाकून टेम्पो जप्त केला. या गोष्टीचा राग मनात धरून दि. 2 जून 2023 रोजी रात्री 9.30 वाजे दरम्यान आरोपी राजू कोरडे याच्या घरी जात तुम्ही खूप माजले आहात. आमची गाडी पकडून देता काय? असे म्हणून त्यांनी शिवीगाळ केली.

तसेच राजू कोरडे व त्याच्या कुटुंबीयांना लाथा बुक्क्यांनी व दांड्याने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली घटनेनंतर राजू कोरडे याच्या फिर्यादीवरून आरोपी गंगाधर दिनकर कोरडे, भावड्या गंगाराम कोरडे दीपक सखाराम कोरडे, गोविंद उत्तम कोरडे, गणेश बाजीराव कोरडे, (सर्व रा. कोळेवाडी, ता. राहुरी) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button