पाथर्डी तालुका : चोरट्यांच्या मारहाणीत संजय गुरसाळी यांचा मृत्‍यू | पुढारी

पाथर्डी तालुका : चोरट्यांच्या मारहाणीत संजय गुरसाळी यांचा मृत्‍यू

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : देवांग कोष्टी समाजाचे उपाध्यक्ष संजय रामचंद्र गुरसाळी (वय ५५) यांची अज्ञात चोरट्यांकडून हत्या करण्यात आली आहे. पाथर्डी शहरातील रंगार गल्ली येथे राहणाऱ्या गुरसाळी यांच्या घरात चोरट्यांनी चोरी करण्यासाठीं प्रवेश करून त्यामध्ये सोन्याचे दागिने चोरून नेत, संजय गुरसाळी यांच्या डोक्याला चोरट्यांनी गंभीर दुखापत करून त्यांची हत्या केली. ही घटना आज मंगळवारी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील व्यक्तीच्या निदर्शनास आली. नेहमीप्रमाणे गुरसाळी कुटुंबीय सोमवारी रात्री दहा वाजल्याच्या नंतर झोपी गेले. त्यानंतर पहाटे दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.

गुरसाळी आणि त्यांचे भाऊ यांचा खानोळीचा व्यवसाय होता. तसेच संजय यांची शहरातील नवी पेठ येथे इलेक्ट्रिक दुकान आहे, त्यातून ते दुरुस्ती आणि खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे. गुरसाळी यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, कौशल्य राम निरंजन वाघ हे पोलिस फौज फाट्यासह दाखल झाले होते.

 

Back to top button