एकरुखे : श्रीगणेश कारखान्यासाठी 106 इच्छुकांचे अर्ज | पुढारी

एकरुखे : श्रीगणेश कारखान्यासाठी 106 इच्छुकांचे अर्ज

एकरुखे(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांची कामधेनू असलेल्या श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या 17 जून रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 19 जागांसाठी 106 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. श्रीगणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 15 मेपासुन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. शुक्रवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, गुरुवारी 14 तर शुक्रवारी तब्बल 92 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. असे एकूण 106 जणांनी अर्ज दाखल केले.

दाखल अर्ज पुढील प्रमाणे- सर्वसाधारण उत्पादक शिर्डी गट क्रमांक 1- बाबासाहेब दादा डांगे, बाजीराव कोंडाजी थेटे, भाऊसाहेब पंढरीनाथ थेटे, विजय भानुदास दंडवते, अशोक दामोधर दंडवते, अनुप अशोकराव दंडवते, बाबासाहेब रामभाऊ डांगे, दिगंबर शिवराम कोते, विलास यादवराव कोते, विनायक यशवंत कोते, बाबासाहेब परसराम मते असे 2 जागांसाठी 11 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

राहाता गट क्रमांक 2- शिवाजी तुकाराम अनाप, नारायण ज्ञानेश्वर कार्ले, उत्तम बळवंत डांगे, ज्ञानेश्वर बाबुराव सदाफळ, अनिल सोपान सदाफळ, संपत कचरु हिंगे, पुंजाजी दगडू गमे (2 अर्ज), गंगाधर पांडूरंग डांगे असे 3 जागांसाठी 9 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अस्तगाव गट क्रमांक 3- हौशिराम विश्वनाथ चोळके (2 अर्ज), बाबासाहेब नामदेव निर्मळ (देवराम), महेंद्र चांगदेव गोर्डे, सतीश पंढरीनाथ मोरे, नानासाहेब काशिनाथ नळे, विष्णु जगन्नाथ घोरपडे, शिवनाथ नेवजी घोरपडे, संजय कारभारी नळे, जालिंदर गंगाधर मुरादे, विजय रामभाऊ जेजुरकर, ज्ञानदेव बाजीराव चोळके, संजय गणपत चोळके, बाळासाहेब कुंडलिक चोळके, सूर्यभान दशरथ गोर्डे असे 3 जागांसाठी 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले.

वाकडी गट क्रमांक 4- अरुंधती अरविंद फोपसे, बाळासाहेब भाऊसाहेब लहारे, रामकृष्ण खंडू बोरकर, विठ्ठल कचरु शेळके, भास्कर नानासाहेब घोरपडे, सुधीर वसंतराव लहारे, गजबा रंगनाथ फोपसे, विशाल पुरुषोत्तम गोरे, राजेंद्र विठ्ठल लहारे, नारायण भिकाजी शेळके, संपत काशिनाथ शेळके, विष्णुपंत शंकर शेळके असे 3 जागांसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले.

पुणतांबा गट क्रमांक 5- नानासाहेब खुशाल गाढवे, बापु पंढरीनाथ धनवटे, मंदा दादासाहेब गाढवे, अण्णासाहेब जनार्दन सातव, दिलीप दादा क्षिरसागर, चंद्रकांत यादव डोखे, प्रकाश भिमाशंकर वहाडणे, उमाकांत भास्कर धनवटे, साहेबराव तुकाराम बनकर, जनार्दन भागुजी गाढवे, अनिल सोपान गाढवे, दीपक रामकृष्ण डोखे, संपत नाथाजी चौधरी, यशवंत अण्णासाहेब चौधरी, दत्तात्रय सदाशिव धनवटे, बाळासाहेब दत्तात्रय गाढवे असे 2 जागांसाठी 16 उमेदवारांनी अर्ज भरले.

ओबीसी मतदार संघ- नारायण गोविंद भुजबळ, अण्णासाहेब बजाबा वाघे, शिवाजी तुकाराम अनाप, बलराज पुंडलिक धनवटे, नाना रेवजी शेळके, अनिल राजाराम टिळेकर, सुनिता तुकाराम बोरबणे, प्रकाश रामदास पुंड, सुरेश सुकदेव गाडेकर, विजय रामभाऊ जेजुरकर असे 1 जागेसाठी 10 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था, पणन संस्था प्रतिनिधी मतदार संघ- सुधाकर नारायण जाधव, राजेंद्र विठ्ठलराव लहारे, यशवंत अण्णासाहेब चौधरी, ज्ञानदेव बाजीराव चोळके या ब गट मतदार संघातुन 1 जागेसाठी 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अनु. जाती/ जमाती मतदार संघ- अलेश शांतवन कापसे, बाबासाहेब गणपत पाळंदे, दत्तात्रय मारुती पोटे, गणेश बाबुराव थोरात, प्रदिप पोपटराव बनसोडे असे 1 जागेसाठी 5 जणांनी अर्ज दाखल केले.

महिला प्रतिनिधी मतदार संघ-अरुंधती अरविंद फोपसे, वैशाली दिलीप क्षिरसागर, लताताई लक्ष्मण डांगे, लक्ष्मीबाई नानासाहेब गाढवे, शोभाताई एकनाथ गोंदकर, कांचनमाला तुकाराम गाढवे, कमलबाई पुंडलिक धनवटे, सुजाता बाळासाहेब शेळके, सुनिता तुकाराम बोरबणे, मंदा दादासाहेब गाढवे, सुलभा मधुकर कोते, अनिता विलास कोते, लता बाबासाहेब डांगे, गयाबाई ओंकार भवर, सुनिता रामेश्वर फोपसे, मंदाकिनी विठ्ठल डांगे 2 जागांसाठी 16 जणी इच्छुक आहेत.

भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी- भगवंता मायंजी मासाळ, अण्णासाहेब जनार्दन सातव, भिमराज चांगदेव रक्टे, मधुकर यशवंतराव सातव, सुनिल मुरलीधर थोरात, संजय आबाजी भाकरे, साहेबराव भाऊराव काटकर, वसंत सखाराम गायकवाड असे 1 जागेसाठी 8 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रांताधिकारी माणिक आहेर काम पाहत आहेत. त्यांना तहसीलदार अमोल मोरे सहकार्य करीत आहे.

6 जूनला होणार निवडणुकीचे चित्र स्पष्ट

दाखल अर्जांची छाननी उद्या 22 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. 23 मे ते 6 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते दु. 3 यावेळेत मागे घेता येईल. दि. 6 जून रोजी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

Back to top button