अहमदनगर : सहा हॉटेल्स्वर पोलिसांचे छापे; 43 हजारांचा मद्यसाठा केला जप्त | पुढारी

अहमदनगर : सहा हॉटेल्स्वर पोलिसांचे छापे; 43 हजारांचा मद्यसाठा केला जप्त

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध मद्यविक्री होत असलेल्या सहा हॉटेल्स्वर पोलिसांनी छापेमारी करत 43 हजारांचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत सहा जणांवर ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश गोरख विरकर (वय 38, रा.जेऊर बायजाबाई), सागर नारायण पवार (वय 32, रा.चाफेवाडी, जेउर बायजाबाई), गोकूळ प्रकाश बांगर (वय 24, रा.जवळवाडी, ता.पाथर्डी), पंकज मच्छिंद्र निकम (वय 26, रा.वडगाव गुप्ता), देविदास जगन्नाथ येवले (वय 34, रा.जेउर बायजाबाई), अविनाश मधुकर डोंगरे (वय 35, रा.वडगाव गुप्ता), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

हॉटेल राजयोग, हॉटेल न्यू सम्राट, हॉटेल राजयोग खोसपूरी, हॉटेल महालक्ष्मी, हॉटेल किनारा, हॉटेल जगदंबा या सहा हॉटेल्स्वर ही कारवाई करण्यात आली. देशी व विदेशी असा 43 हजार 30 रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार देशमुख, पोलिस नाईक दीपक गांगर्डे, किशोर जाधव, सचिन हरदास, भगवान वंजारी, तांदळे यांनी ही कारवाई केली.

Back to top button