साकूर येथे जुगार अड्ड्यावर टाकला छापा | पुढारी

साकूर येथे जुगार अड्ड्यावर टाकला छापा

बोटा; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून रोख व जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. तर ही कारवाई शुक्रवार (दि. 21) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान केली आहे.
साकुर गावात बाजारतळाजवळ टपरीच्या आडोश्याला जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना समजली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने साकुर गाव गाठवत बाजारतळाजवळ टपरीच्या आडोश्याला अकबर बशीर शेख (वय 45, रा.वाघवस्ती साकूर) हा लोकांना चिठ्ठ्यांवर आकडे लिहून देऊन त्यांचे कडून पैसे घेऊन स्वताच्या फायद्याकरीता कल्याण मटका नावाचा हार- जितीचा मटका जुगार खेळताना व खेळविताना आढळून आला.

जुगार खेळण्यासाठी लागणार्‍या जुगाराच्या साधनांसह विविध दराच्या एकवींशे रुपये रोख रकमेसह मिळून आला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रणजीत जाधव नेम स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकबर बशीर शेख (रा. वाघ वस्ती, साकूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ वायळ करत आहेत. दरम्यान पठार भागात दिवसेंदिवस अवैध व्यवसायीकांचे पाळेमुळे घट्ट होत चालले असून अवैध व्यवसायीकांना सुगीचे दिवस आले आहेत. तर घारगांव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवण्यापेक्षा अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळून खाकीचा धाक ठेवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Back to top button