एक जागा बिनविरोध; गडाखांची बाजी; नेवाशात 17 जागांसाठी 35 उमेदवार | पुढारी

एक जागा बिनविरोध; गडाखांची बाजी; नेवाशात 17 जागांसाठी 35 उमेदवार

कैलास शिंदे

नेवासा : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 112 जणांपैकी 77 जणांनी माघार घेतल्याने आता 17 जागांकरिता 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सत्ताधारी गडाख गटाची हमाल मापाडीमधील 1 जागा बिनविरोध झाली आहे. तर विरोधी मुरकुटे-लंघे गटाला 2 जागांवर उमेदवार देता आला नाही.

नेवासा बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 30 एप्रिलला 18 पैकी 1 जागा बिनविरोध झाल्याने 17 जागांसाठी मतदान होणार आहे. नेवासा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी व विरोधकांच्या जोर बैठका झाल्या. गुरूवारी (दि.20) उमेदवारी माघारीची अंतिम मुदत असल्याने बाजार समितीच्या आवारात उमेदवार व कार्यकर्त्यांती मोठी गर्दी झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे व सहाय्यक म्हणून सुखदेव ठोंबरे, सचिव देवदत्त पालवे काम पाहत आहेत.

निवडणुकीत उभे असलेले उमेदवार असे – सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण – अर्जुन नवले, अमृत काळे, हरिश्चंद्र पटारे, अरूण सावंत, मीराबाई ढोकणे, नंदकुमार पाटील, अरूण शिंदे (सत्ताधारी गडाख गट), अनिल ताके, बापूसाहेब डिके, मुकेश क्षीरसागर, अर्जुन मोटे, योगेश तागड, गोरक्षनाथ गायकवाड, रविकांत शेळके (विरोधी मुरकुटे-लंघे गट). महिला राखीव – संगीता राजेंद्र सानप, अश्विनी भारत काळे (सत्ताधारी), हिराबाई भारत गुंजाळ, आशा वसंत शेटे (विरोधी), चंद्रकला ज्ञानदेव पाडळे (अपक्ष). अनुसूचित जाती – सुंदराबाई सारंगधर ढवाण (सत्ताधारी), पोपट अशोक बनसोडे (विरोधी). इतर मागासवर्गीय – बाबासाहेब रंगनाथ आखाडे (सत्ताधारी), कैलास मुरलीधर दहातोंडे (विरोधी).

ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण – नानासाहेब साहेबराव नवथर, बाळासाहेब मच्छिंद्र दहातोंडे (सत्ताधारी), देविदास सदाशिव साळुंके, विश्वास काळे (विरोधी), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष). अनुसूचित जाती जमाती – सुनील दिगंबर धायजे (सत्ताधारी), गोरक्षनाथ कडू कानडे (विरोधी). आर्थिक दुर्बल घटक – गणेश पुरूषोत्तम भोरे (सत्ताधारी), रावसाहेब अर्जुन होन (विरोधी). आडते व्यापारी – संतोष तुकाराम मिसाळ, दौलतराव चंद्रकुमार देशमुख (सत्ताधारी), सिद्दीक गणी चौधरी (विरोधी).

दोन ठिकाणी पती – पत्नी अपक्ष म्हणून नशिब आजमावत आहेत. 3301 मतदार संख्या आहे. नेवासा बाजार समितीत विरोधकांना 18 ठिकाणी उमेदवार देता आला नसल्याने त्यांचा लंगडा पँनल झाला आहे. तर काही ठिकाणी समोरासमोर लढती होत आहेत. या बाजार समितीवर गडाख गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.

  • निवडणूक रिंगणातून 77 उमेदवारांची माघार
  • दोन जागांवर विरोधकांचा उमेदवारच नाही
  • दोन ठिकाणी पती-पत्नी अपक्ष म्हणून रिंगणात

गडाख गटाचे रमेश मोटे बिनविरोध
हमाल-मापाडी मतदारसंघातून सत्ताधारी गडाख गटाचे रमेश भाऊसाहेब मोटे हे बिनविरोध निवडून आले आहेत. याठिकाणी व व्यापारी मतदारसंघातून विरोधकांना उमेदवार मिळालेला नाही. 18 पैकी दोन ठिकाणी विरोधकांचा उमेदवारच नाही.

दोन्ही गटांकडून ग्रामीण भागाला प्राधान्य
आगामी काळात नेवासा नगरपंचायत व विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी गटाकडून या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

मातब्बर उमेदवारांनी ऐनवेळी माघार
माजी आमदार मुरकुटे यांच्या धरसोड वृत्तीमुळे विरोधी पॅनलमधून मातब्बर उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली असल्याचे बोलले जात आहे. हमाल मापाडी मतदार संघात गडाख गटाची एक जागा बिनविरोध झाली असून, व्यापारी मतदारसंघातही मुरकटे यांना एकच

Back to top button