शेवगाव : राष्ट्रवादी-भाजपात लढत; महाविकास आघाडीत पडली फूट | पुढारी

शेवगाव : राष्ट्रवादी-भाजपात लढत; महाविकास आघाडीत पडली फूट

रमेश चौधरी

शेवगाव तालुका : शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व भाजपा अशी सरळ दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत 38 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने ‘एकला चलो’ची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीत फूट पडली असून, काँग्रेसने भाजपबरोबर हातमिळवणी केली आहे. तसेच, मनसेही भाजपसोबत आहे.

बाजार समिती निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरूवारी 212 इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतल्याने, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 18 संचालक पदासाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. यामध्ये भाजपा व राष्ट्रवादी अशी सरळ दुरंगी लढत होत आहे. तर, 2 अपक्ष उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर शेतकरी मंडळ व भाजपाचे आदिनाथ शेतकरी मंडळ, अशा दुरंगी लढतीत राष्ट्रवादी आघाडीचा धर्म पाळण्यास इच्छुक नसल्याने काँग्रेस व मनसे भाजपच्या पॅनलमध्ये सामील झाले आहेत.

निवडणुकीतील उमेदवार पुढीलप्रमाणे – राष्ट्रवादीप्रणित ज्ञानेश्वर मंडळ – सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण – अ‍ॅड. अनिल मडके, राहुल बेडके, नानासाहेब मडके, एकनाथ कसाळ, अशोक धस, जमीर पटेल, गणेश खंबरे. महिला राखीव – चंद्रकला कातकडे, रागिनी लांडे. विमुक्त जाती भटक्या जमाती – राजेंद्र दौंड. इतर मागासवर्गीय – हनुमान पातकळ. ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण – संजय कोळगे, अशोक मेरड, अनु.जाती जमाती – अरूण घाडगे. दुर्बल घटक – प्रिती अंधारे. व्यापारी आडते मतदारसंघ – जाकीर कुरेशी, मनोज तिवारी. हमाल मापाडी मतदारसंघ – प्रदीप नानासाहेब काळे.

भाजपाप्रणित आदिनाथ मंडळ – सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण – भगवान तेलोरे, जगन्नाथ भागवत, हरिभाऊ झुंबड, मुसाभाई शेख, सचिन वाघ, ज्ञानेश्वर कुलट, सोमनाथ आधाट. महिला राखीव – सुनंदा दिवटे, रुख्मिणी सुखासे. इतर मागासवर्ग – सोपान जमधडे. विमुक्त जाती भटक्या जमाती – हनुमान बेळगे. ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण -दिलीप विखे, संभाजी कातकडे. अनु.जाती जमाती – सुखदेव खंडागळे. दुर्बल घटक – वर्षा पवार. व्यापारी आडते मतदारसंघ – खंडू घनवट, डॉ.अमोल फडके. हमाल मापाडी मतदारसंघ- नवनाथ पारठे असे उमेदवार आहेत. तर, वसंत गव्हाणे (सोसायटी) व शिवाजी भुसारी (ग्रामपंचायत) अपक्ष उमेदवार आहेत .

जनशक्ती मंचची निवडणुकीतून माघार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली दोन जागांची मागणी राष्ट्रवादीने धुडकावून लावली. तसेच, इतर घटक पक्षानांही स्थान दिले नाही. तर, जनशक्ती मंच सत्ताधार्‍यांविरोधात विरोधकांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाल्याने, त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

राष्ट्रवादीकडून दोन माजी संचालकांना संधी
बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने फक्त समितीचे माजी चेअरमन अ‍ॅड.अनिल मडके व संजय कोळगे या दोघांनाच पुन्हा संधी दिली आहे. तर, दहिगाव भागात सर्वाधिक 6 उमेदवार, भातकुडगाव भागात 4 उमेदवार, दिले असून, चापडगाव भागात 3, बोधेगाव भागात 3 व शहरात 2 असे 18 उमेदवार दिले आहेत.

Back to top button