नगर : एमपीएससीची संयुक्त परीक्षा 30 एप्रिलला | पुढारी

नगर : एमपीएससीची संयुक्त परीक्षा 30 एप्रिलला

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा केंद्रावर 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. नगर केंद्रावरुन 23 हजार 287 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी 77 उपकेंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षार्थीची संख्या जादा असल्यामुळे अहमदनगरबरोबरच आता पारनेर व राहुरी तालुक्यात देखील परीक्षा उपकेंद्र असणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा घेतली जाणार आहे. अहमदनगर येथील 71 उपकेंद्रावर त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यात 5 व राहुरी तालुक्यातील एका उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी 2 हजार 557 अधिकारी व कर्मचार्‍यांचा स्टाफ नियुक्त करण्यात आलेला आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त असणार आहे. परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्वत:च आयोगाच्या वेबसाईटवर डाऊनलोड करुन घ्यावयाची आहेत. दुय्यम प्रवेशपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा केंद्र प्रमुुख राजेंद्रकुमार पाटील यांनी सांगितले.

Back to top button