नगरमध्ये बायोमेट्रिक प्रणालीचा आदेश वार्‍यावर ; सर्वच ग्रामपंचायतींकडून दुर्लक्ष | पुढारी

नगरमध्ये बायोमेट्रिक प्रणालीचा आदेश वार्‍यावर ; सर्वच ग्रामपंचायतींकडून दुर्लक्ष

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : कामचुकार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकार्‍यांना वचक बसावा व त्यांनी वेळेत येऊन कामे करावी, यासाठी राज्य शासनाने बायोमेट्रिक प्रणाली सुरू केली आहे. शासनाने तसा अध्यादेश काढून दोन महिने झाले आहेत. मात्र, पाथर्डी तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीने अद्यापि बायोमेट्रिक प्रणाली सुरू केलेली नाही. या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली (हजेरी) त्वरित सुरू करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांना खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक परमेश्वर टकले, प्रकाश कचरे, नानाभाऊ पडळकर, म्हातारदेव बांगर, रमेश कचरे आदींनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतींनी बायोमेट्रिक प्रणाली सुरू न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पंचायत समिती समोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. बायोमेट्रिक हजेरीमुळे कामचुकारपणा करणार्‍या व नेहमीच मीटिंगची कारणे सांगणार्‍या ग्रामसेवकांना आळा बसेल व गावातील कामे गावातच होतील. यासाठी बायोमेट्रिक प्रणाली पाथर्डी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत त्वरित सुरू करावी, अशी मागणी गटविकास अधिकारी डॉ.पालवे यांना भेटून करण्यात आली आहे.

वारंवार संपर्क करण्याची वेळ
गावातील छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांना वारंवार संपर्क करावा लागतो. त्यांच्याकडून काहीही कारणे सांगून वेळ मारून नेली जाते. गावातील कामांना गती देण्यासाठी व लोकांचे काम मार्गी लागण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू केल्यास कामचुकार अधिकार्‍यांना आळा

Back to top button