वाकडी रस्त्यासाठी प्रशासकीय मान्यता : आ. आशुतोष काळे | पुढारी

वाकडी रस्त्यासाठी प्रशासकीय मान्यता : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : पुणतांबा गावाला जोडणार्‍या पुणतांबा-न.पा. वाडी या साडेपाच किलोमीटर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे नपावाडीचा पुणतांबा गावाशी संपर्क तुटला होता. त्यामुळे पुणतांबा गावच्या बाजारपेठेवर देखील मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी पुणतांबा-नपावाडीच्या ग्रामस्थांची तसेच संभाजीनगर ते वाकडी या रस्त्याची देखील दुरुस्ती व्हावी अशी वाकडी, संभाजीनगर मधील ग्रामस्थांची मागणी होती. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन या रस्त्याला निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून पुणतांबा-नपावाडी व संभाजीनगर ते वाकडी या दोन्ही रस्त्यांसाठी 9.63 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

पुणतांबा-नपावाडी ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून पुणतांबा-नपावाडी या साडे पाच किलोमीटर रस्त्यासाठी ‘मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा 2’ योजना (सर्वसाधारण) (डीपीसी) अंतर्गत 5.20 कोटी व संभाजीनगर ते वाकडी या रस्त्यासाठी 4.43 कोटी असा एकूण 9.63 कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. पुणतांबा-नपावाडी या साडेपाच किलोमीटर रस्त्याचे काम मार्गी लागल्यामुळे पुणतांबा गावाशी पुन्हा नागरिकांचा संपर्क वाढणार असून निश्चितच पुणतांबा गावची बाजारपेठ पुन्हा फुलणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काळे यांचे आभार मानले.

Back to top button