नेवासा : अल्पवयीन मुलीचा तरूणाकडून विनयभंग | पुढारी

नेवासा : अल्पवयीन मुलीचा तरूणाकडून विनयभंग

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी घराच्या बाथरूमजवळ भांडे घासत असताना आरोपीने तिची छेड काढली. मुलगी घाबरून घरात पळाली असता, या तरूणाने घरात प्रवेश करून माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे आयुष्य बरबाद करील, अशी धमकी देत विनयभंग केला. मुलीने आरडाओरड करताच तिची बहीण घरी आल्याने या तरूणाने तेथून धूम ठोकली. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात शुभम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button