सुपा : कार्यक्रमांमधून कलागुणांना वाव : आमदार नीलेश लंके | पुढारी

सुपा : कार्यक्रमांमधून कलागुणांना वाव : आमदार नीलेश लंके

सुपा; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थी विविध क्षेत्रांत नव्या उमेदीने काम करत असतात. वार्षिक स्नेहसंमेलनासारख्या कार्यक्रमांतून त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. म्हसणे फाटा येथील श्री समर्थ अ‍ॅकाडमीत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. त्याचे उद्घाटन आमदार लंके यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी जि. प. सदस्या राणीताई लंके, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, संस्थेचे संचालक प्रा.कैलास गाडीलकर, शिल्पा गाडीलकर, किर्तीकुमार शिदांनी, प्राचार्य भाऊसाहेब अनारसे, गणेश देठे, निरंजन यादव, डॉ.अरूणाताई भांबरे, अमितकुमार राव, प्रमोद पाठक, अभियंता विनायक कुलधर, निता कुलधर आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भावगीते, नाटक सादर केले. समर्थ अकॅडमीतच प्रवेश का घ्यायचा, या नाटिकेने पालकवर्गाची मने भारावली. मागील वर्षी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा पदक, बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. श्रीकांत चौरे यांना पत्रकारितेचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अरूणाताई भांबरे यांनी केले. आभार प्राचार्य देठे मानले.

विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी ओळखा
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी ओळखल्या पाहिजेत. त्यासाठी पालकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. पालकांनी हव्या त्या क्षेत्रात मुलांना वाव दिला पाहिजे. असे केल्यास विद्यार्थी निश्चित यशस्वी होईल, असे शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले.

Back to top button