विसापूर कारागृहातील फरार कैद्यास अटक | पुढारी

विसापूर कारागृहातील फरार कैद्यास अटक

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सावरगाव येथील महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी विसापूर कारागृहातूनफरार झाला. त्याला जामखेड पोलिसांनी एक वर्षानंतर मोठ्या शिताफीने अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माह्तिीनुसार सन 2010 म÷ध्ये आरोपी विजय गहिनीनाथ चव्हाण (रा. सावरगाव, ता. जामखेड) याने एका महिलेचा खून केला आहे.

त्यावेळी त्याच्याविरुध्द जामखेड पोलिस ठाण्याचा खुनाचा गुन्हा दाखल करणेत आला. या गुन्हयाचा तपास तत्कालिन पोलिस निरीक्षक स्वर्गीय ज्ञानेश्वर ढोकले व त्यांच्या पथकाने करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात भक्कम पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले होते. त्यांनतर सदर खटल्याची सुनावणी नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात होऊन आरोपीविरुद्ध गुन्हा सिध्द झाल्याने सन 2012 मध्ये त्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलीे. तेव्हापासुन आरोपी विजय चव्हाण हा शिक्षा भोगत होता.

एक वर्षापूर्वी आरोपी विजय चव्हाण हा विसापूर कारागृहातून फरार झाला होता. त्या बाबत त्याच्याविरुद्ध बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविणेत आला आहे.फरार आरोपी अधूनमधून सावरगाव येथे येत असल्याची माहिती तीन महिन्यांपासून पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीटअंमलदार हवालदार संजय लाटे व कॉन्स्टेबल सचिन पिरगळ आरोपीवर पाळत ठेवून होते. परंतु तो आरोपी गुंगारा देत होत होता.

Back to top button