टाकळी ढोकेश्वर : मातोश्री संकुल मिनी विद्यापीठ : आमदार नीलेश लंके | पुढारी

टाकळी ढोकेश्वर : मातोश्री संकुल मिनी विद्यापीठ : आमदार नीलेश लंके

टाकळी ढोकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : मातोश्री शैक्षणिक संकुलात युकेजीपासून ते वैद्यकीय पदवी मिळत असल्याने हे मिनी विद्यापीठ असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. मातोश्री शैक्षणिक संकुलात दोन दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी गुरुदत्त पतसंस्थेचे अध्यक्ष बा. ठ. झावरे, बाळासाहेब उंडे, सरपंच अरुणा खिलारी, रावसाहेब झावरे, भागुजी झावरे, बाळासाहेब खिलारी, संस्थेच्या अध्यक्ष मीराताई आहेर, डॉ.श्वेंतांबरी आहेर, प्राचार्य शितल आहेर आदी उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले, नवीन रुग्णालयाला व मातोश्री आयुर्वेदिक महाविद्यालयाला राज्य व केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे इंजिनियरिंग व वैद्यकीय क्षेत्रामध्ये नगर कल्याण महामार्गावर या आयुर्वेदिक संकुलाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे एक उज्ज्वल भविष्य या मातोश्री संस्थेला आहे.

Back to top button