नगर : शहर बँकेवर पुन्हा घैसास-गुंदेचांची सत्ता; सर्व जागा जिंकल्या | पुढारी

नगर : शहर बँकेवर पुन्हा घैसास-गुंदेचांची सत्ता; सर्व जागा जिंकल्या

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 15 जागा जिंकून घैसास-गुंदेचा मित्रमंडळाच्या सुयश पनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवित बँकेची सत्ता अबाधित राखली. तिघा अपक्ष उमेदवारांना तोकडी मते मिळाली. अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी काल रविवारी(दि. 29) रोजी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील 30 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली. बँकेचे सभासद असलेल्या 12 हजार 110 मतदारांपैकी 2 हजार 997 मतदारांनी हक्क बजाविला. एकूण तीस मतदान केंद्रावर एकूण अवघे 24.75 टक्के मतदान झाले होते. प्रत्येक केंद्रावर 400 मतदार होते. तर, एक जागा बिनविरोध झाली.

सोमवारी(दि. 30) रोजी सकाळी नऊ वाजता नगर-पुणे रस्त्यावरील ओमगार्डन येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी व सहायक निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. इतर मागासप्रवर्गातून संजय घुले अगोदरच बिनविरोध निवडून आले होते.

तर, 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत घैसास-गुंदेचा मित्रमंडळाच्या सुयश पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी विजयश्री खेचून आणला. अपक्ष उमेदवारांना एक हजाराच्या आत मते मिळाली. त्यात सुजित बेडेकर यांना सर्वाधिक 2678 मते मिळाली. त्या पाठोपाठ डॉ. विजयकुमार भंडारी यांना 2647 मते मिळाली. तर, अपक्ष उमेदवार दिलीप अडगटला, अनिस चुडीवाला, सचिन अडगला एक हजाराचा टप्पाही पार करू शकले नाही.

अपक्षांमुळे लागली होती निवडणूक
अहमदनगर शहर सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी मंडळाने विशेष प्रयत्न केले. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर पाच जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने निवडणूक लागली. मात्र, पाचही अपक्षांना एक हजारांच्या आतच मते मिळाली.

उमेदवारांना मिळालेली मते
सर्वसाधारण गट – प्रा. सुजित बेडेकर (2687), डॉ. विजयकुमार भंडारी (2647), सुभाष गुंदेचा (2614), सीए गिरीश घैसास (2575), अशोक कानडे (2570), शिवाजी कदम (2547), डॉ. भूषण अनभुले (2504), प्रा. माणिकराव विधाते (2497), जयंत येलूलकर (2492), निखिल नाहार (2427). अनुसूचित जाती जमाती – प्रदीपकुमार जाधव (1944), महिला प्रतिनिधी – रेश्मा आठरे-चव्हाण (2560), स्वाती कांबळे (2319), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – संजय घुले (बिनविरोध), वि.जा.भ.ज.वि.मा.प्र.- दत्तात्रय रासकोंडा (2209

Back to top button