नगर ग्रामपंचयात Live : शेवगाव : तालुक्यातील सात ग्रामपंचयातींवर राष्ट्रवादीचा सरपंच | पुढारी

नगर ग्रामपंचयात Live : शेवगाव : तालुक्यातील सात ग्रामपंचयातींवर राष्ट्रवादीचा सरपंच

शेवगाव तालुका : वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असुन यामध्ये राष्ट्रवादीकडे ७, भाजपाकडे ३ तर जनशक्ती ला १ सरपंचदाचा मान मिळाला आहे. अटीतटीच्या झालेल्या शेवगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीची तहसील कार्यालयात आज मंगळवारी मतमोजणी झाली. जनतेतून सरपंचपद असल्याने निकालाची सर्वांना उत्सुकता लागली होती. या निवडणुकीच्या निकालासाठी सहा टेबलवर एकाचवेळी सहा ग्रामपंचायतीची मतमोजणी होऊण दोन फेऱ्यात सर्व निकाल जाहीर झाले. यामध्ये राष्ट्रवादीकडे ७, भाजपाकडे ३ तर जनशक्ती ने १ सरपंचपदावर विजय मिळविला.

निकाल जाहीर झाल्यानंतर रावतळे-कुरुगावचे सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकला नवनाथ कवडे यांनी आपण तुर्त अलिप्त असल्याचे सांगितले. निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभुवाडगाव, खामगाव, जोहरापूर, खानापूर, भायगाव, रांजणी व दहिगावने या सात ग्रामपंचायतीचे सरपंचपदावर विजय मिळवला. वाघोली, सुलतानपूर, अमरापूर येथील सरपंचपदावर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. तर आखेगाव सरपंचपदावर जनशक्ती विकास आघाडीचा विजय झाला. तर कुरुगाव-रावतळे येथे चंद्रकांत नवनाथ कवडे यांनी अलिप्त असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार : ज्ञानदेव निवृत्ती घोडेराव (प्रभुवाडगाव), विद्या अरूण बडधे (खामगाव), स्नेहल रोहन लांडे (जोहरापूर), शितल मंगेश थोरात (खानापूर), मनिषा राजेंद्र आढाव (भायगाव), काकासाहेब मुरलीधर घुले (रांजणी), सुनिता देवदान कांबळे (दहिगाव-ने) असे आहेत.

भाजपाचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार:  सुश्मिता उमेश भालसिंग (वाघोली), सविता विजय फलके (सुलतानपूर), आशाताई बाबासाहेब गरड (अमरापूर) असे आहेत.

जनशक्ती आघाडीचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार : आयोध्या शंकर काटे (आखेगाव)

ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार पडली. निकाल जाहीर होताच तहसील कार्यालयाच्या आवारात जमलेल्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला .

Back to top button