विरोधी पक्षनेते पवार उद्या श्रीगोंदा दौर्‍यावर ; कुकडी कारखान्यावर परिसंवाद | पुढारी

विरोधी पक्षनेते पवार उद्या श्रीगोंदा दौर्‍यावर ; कुकडी कारखान्यावर परिसंवाद

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शनिवार (दि.10) श्रीगोंदा तालुक्याच्या दौर्‍यावर येत असून, कुकडी सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या परिसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली. जगताप म्हणाले, श्रीगोंदा तालुक्याचा उसाचे आगार म्हणून तालुक्याचा नावलौकिक राज्यात आहे. सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील गावे विकासाच्या दिशेनं धावू लागली आहेत. सहकार क्षेत्रात कार्यरत असणार्‍या चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे या विकासात असणारे योगदान अनन्यसाधारण आहे.

ग्रामीण भागाच्या विकासात या दोन संस्थांमध्ये काम करणार्‍या लोकांची स्वतःला झोकून देऊन निरंतर सुरू असणारी सेवा अद्वितीय आहे. दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी यांच्याशी हितगूज साधण्याचा बर्‍याच दिवसापासून विचार सुरू होता. 10 डिसेंबर 2022 रोजी हा परिसंवाद मेळावा कुकडी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी विरोधी पक्षनेते ना.अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

Back to top button