वाळकी : चोरट्यांनी पळविले 15 वीजपंप | पुढारी

वाळकी : चोरट्यांनी पळविले 15 वीजपंप

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : वीजपंप दुरुस्तीचे दुकान चोरट्यांनी फोडून विविध कंपन्यांचे सुमारे 15 वीजपंप व 12 किलो तांब्याची मोटार रिवाईंडींगची तार चोरून नेण्याचा प्रकार नगर तालुक्यातील पोखर्डी शिवारातील जावळेवस्तीवर बुधवारी (दि.30) पहाटे घडला.
याबाबत तौसिक बाबासाहेब शेख (कापूरवाडी, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शेख यांचे पोखर्डी शिवारातील जावळे वस्तीवर वीजपंप दुरुस्तीचे दुकान आहे.

त्या दुकानात वीजपंप दुरुस्तीसाठी आले होते. ते त्यांनी दुरुस्त करून ठेवले व मंगळवारी (दि.29) रात्री ते दुकान बंद करून घरी गेले. बुधवारी (दि.30) सकाळी 9.30 वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानात चोरी झाल्याचे आढळून आले.
चोरट्यांनी दुकानातील 5 अश्वशक्तीचे 4 वीजपंप, 3 अश्वशक्तीचे 3 वीजपंप, 7.5 अश्वशक्तीचा 1 पंप, 2 अश्वशक्तीचे 3 वीजपंप तसेच 3 अश्वशक्तीचे 3 बोअरवेलचे वीज पंप, तसेच 12 किलो तांब्याची तार आदी साहित्य चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button