वाळकी : दरोडेखोरांची सशस्त्र टोळी जेरबंद | पुढारी

वाळकी : दरोडेखोरांची सशस्त्र टोळी जेरबंद

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : गावठी बनावटीचा कट्टा (पिस्तुल), धारदार चाकूसह अन्य घातक शस्त्रे घेऊन दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या चार दरोडेखोरांच्या टोळीला नगर तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा लावून शिताफीने जेरबंद केले. टोळीतील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. शनिवारी (दि.5) रात्री रुईछत्तीशी ते वडगाव तांदळी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
अजय गजानन काळे (वय 20, रा.तांबेमळा, बुरुडगाव,ता.नगर), भागुजी भोसले (वय 30, रा. निमगाव चोभा, ता. आष्टी, जि. बीड), गिरधर पुंजाबाप्पू भोसले (वय 50,रा. निमगाव चोभा, ता.आष्टी, जि. बीड), हरिदास आगुचंद काळे (वय 45,रा. वाकी, ता.आष्टी,जि. बीड) या अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, हर्षल हबर्‍या काळे (रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

शनिवारी (दि.5) सायंकाळपासून सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक रणजीत मारग, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस भगवान गांगर्डे, भानुदास सोनवणे, शैलेश सरोदे, संतोष लगड, योगेश ठाणगे, राहुल शिंदे, सोमनाथ वडणे, संभाजी बोराडे, संदीप जाधव, राजू खेडकर व जयदीप बांगर सरकारी वाहन व खासगी वाहनासह गस्त घालताना ही कारवाई केली. गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, एक चाकू, दुसर्‍या जवळ चाकू, तीन मोटारसायकली, मोबाईल असा 1लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी दरोडेखोरांकडून जप्त केला.

 

Back to top button