राकेश ओला नगरचे नवे एसपी | पुढारी

राकेश ओला नगरचे नवे एसपी

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाने गुरूवारी रात्री उशिराने काढले. त्यात मनोज पाटील यांची बदली झाली असून राकेश ओला यांची नगरचे नवे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओला हे शनिवारी (दि.22) रोजी नगरचा पद्भार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सोलापूर येथून मनोज पाटील यांची नगरला एसपी म्हणून ऑक्टोबर 2020 रोजी बदली झाली होती. तीन पोलिसांच्या आत्महत्येमुळे नगर जिल्हा राज्यात चर्चेला आला. त्यानंतर पाटील यांच्या बदलीचे आदेश निघाले. ओला हे 2012 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसपी म्हणून ते कार्यरत होते. आता त्यांची बदली नगरचे एसपी म्हणून झाली आहे.

Back to top button