नगर: रेखा जरे खून खटल्यात तेलंगणातील चार आरोपींची कोर्टात हजेरी | पुढारी

नगर: रेखा जरे खून खटल्यात तेलंगणातील चार आरोपींची कोर्टात हजेरी

नगर, पुढारी वृत्तसेवा: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून खटल्याच्या (दि.6) सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी तेलंगणातील चार आरोपींनी हजेरी लावली. या प्रकरणात पत्रकार बोठे हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आल्यानंतर बोठेसह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. फरार असताना बोठे याला मदत करणार्‍या आणखी सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण 12 पैकी सहा जणांना जामीन मंजूर झाला असून सहा जण न्यायालयीन कोठडीत आहेत. बुधवार (दि.6) रोजी झालेल्या सुनावणीत जामीनावर असलेल्या सहा आरोपींपैकी चार आरोपींनी न्यायालयात हजेरी लावली. तसेच अटकेत असलेल्या आरोपी आदित्य चोळके याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र, त्यावर न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही.

रेखा जरे खून खटल्यातील पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. या तारखेत आरोपींवर आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे.
– अ‍ॅड. उमेशचंद्र यादव, विशेष सरकारी वकील

Back to top button