चंदनापुरी घाटात दरड कोसळली, महामार्ग पोलिसांनी केली वाहतूक सुरळीत | पुढारी

चंदनापुरी घाटात दरड कोसळली, महामार्ग पोलिसांनी केली वाहतूक सुरळीत

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. या महामार्गावरील दरडीचे दगड महामार्गावर आल्यामुळे काहीवेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, मात्र डोळसणी महामार्ग पोलिसांच्या पथकाने हे दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण करताना चंदनापुरी घाटामधील दोन्ही बाजूंनी सुरुंगाचा स्पोर्ट करून डोंगर फोडले आहेत.त्याच्या स्फोटाने आसपासचे डोंगरही खिळखिळे झाले. यातून गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळल्याने अपघातांची शक्यता वाढत आहे. कंपनीने काही ठिकाणी डोंगरावर लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत.

दखल घेतली आहे
पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटातील डोंगरांच्या दरडी कोसळून महामार्गावर येवून जीवितहानी होवू नये यासाठी उपाययोजनांची गरज आहे. या घटनेची महामार्ग पोलिसांनी दखल घेतली. दुर्घटना घडू नये यासाठी महामार्ग प्राधिकरणाशी पत्र व्यवहार केला, असे पोउनि. सचिन सूर्यवंशी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

Back to top button