संगमनेर : पोलिस निरीक्षक देशमुख यांची बदली, भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | पुढारी

संगमनेर : पोलिस निरीक्षक देशमुख यांची बदली, भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा: संगमनेर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची जिल्हा मुख्यालयात बदली झाली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाक्याची आतिषबाजी केली. संगमनेरचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या विरोधात भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी त्यांच्या बदलीबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी तक्रार केली होती.

परंतु त्या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. मात्र, राज्यात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून बदली अर्ज जिल्हा पोलिस प्रमुखांकडे दिला होता. त्यानंतर त्यांचा आज बदली आदेश निघाला आहे. संगमनेर शहराचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची बदली झाल्याचे वृत्त संगमनेरात येऊन धडकताच भाजपा कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर फटाके फोडले.
विश्व हिंदू परिषदेत व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी जोरदार फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

Back to top button