घोडेगावमध्ये 95 हजार गोण्या कांद्याची आवक | पुढारी

घोडेगावमध्ये 95 हजार गोण्या कांद्याची आवक

घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी (दि. 24 )कांद्याची 95 हजार 451 गोण्या इतकी विक्रमी आवक झाली. कालच्या लिलावात मागील बाजारच्या तुलनेत दरात 100 रुपयांची घसरण झाली, तर 1700 रुपयांपर्यंत कांद्याला भाव मिळाला. बुधवारी कांद्याची मोठी आवक वाढ झाली. येत्या शुक्रवारी बैल पोळा सण असल्याने शेतकर्‍यांनी अधिक प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला गेला.

एकूण 525 ट्रक कांद्याची आवक झाली होती. बैलपोळा सणाच्या साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांनी कांदा विक्रीस आणल्यामुळे आवकमध्ये वाढ झाल्याचे चित्र होते. एक नंबरच्या कांद्याला 1600 ते 1700 रुपयांचा भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1500 ते 1600 रुपये, मध्यम कांद्याला 1300 ते 1400 रुपये, त्यानंतरच्या कांद्यास 1100 ते 1200 रुपये, गोल्टी कांद्याला 700 ते 900 रुपये, लहान गोल्टी कांद्याला 500 ते 600 रुपये, जोड कांद्याला 300 ते 600 रुपये, तर हलका, खराब कांद्याला 200 ते 700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कलर पत्ती कमी 700 ते 1000 रुपये असे भाव मिळाला.

Back to top button