नगर : भाव नसल्याने शेतकर्‍यांनी उपटून फेकला झेंडू | पुढारी

नगर : भाव नसल्याने शेतकर्‍यांनी उपटून फेकला झेंडू

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : चांगला बाजारभाव मिळेल, म्हणून दोन एकर शेतात झेंडूचे पिक घेतले, मात्र प्रत्यक्षात अगदी कवडी मोल भाव मिळाल्याने झेंडूची फुले कवडीमोल विकली जावू लागल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील राजू भिका कुरकुटे या तरूणाने दोन एकर झेंडू अक्षरशः उपटून फेकला.

राजू कुरकुटे या तरूण शेतकर्‍याने आपल्या दोन एकर शेतात 6 मे रोजी झेंडूच्या रोपांची मल्चिंग पेपरवर लागवड केली. त्यासाठी ठिबकही केले होते. खते, औषधे, ठिबक, रोप, मजूरी असा सुमारे 2 लाख रूपयांवर खर्च आला. झेंडू सुरू झाल्यानंतर सुरूवातीला दोन तोड्यांना चांगले भावही मिळाले, मात्र त्यानंतर झेंडूचे भाव कोसळले त्यातच पुन्हा रिमझिम पावसाचाही चांगलाच फटका झेंडूला बसला आहे.

आता तर व्यापारी फुले आणू नका, असेही म्हणत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव अखेर झेंडू उपटण्याचा निर्णय घेतला आणि सोमवरी झेंडू उपटण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण झेंडू उपटण्यास दोन दिवस लागणार असल्याचे कुरकुटे यांनी सांगितले. सोन्यासारखा झेंडू उपटून टाकण्याची वेळ शेतकर्‍यावर आली. खर्चही वसूल झाला नाही. कवडीमोल भावाने झेंडूच्या फुलांना भाव मिळू लागल्याने उपटून टाकला, असे कुरकुटे निराशेने म्हणाले.

Back to top button