टाकळीभान : पावसाचे पाणी घरात घुसल्याने धावपळ | पुढारी

टाकळीभान : पावसाचे पाणी घरात घुसल्याने धावपळ

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे टाकळीभान – घोगरगाव रोड परिसरात रहात असलेल्या काही ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने या ग्रामस्थांची मोठी तारांबळ झाली असून गृहोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. टाकळीभान- घोगरगाव रस्त्याची अवस्था दयनिय झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत होते. त्यामुळे ग्रामपंचायतने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुरूम टाकून रस्ता चांगला केला.

मात्र रस्त्याची उंची वाढल्याने या परिसरात सखल भागात रहात असलेल्या ग्रामस्थाच्या घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांच्या गृहउपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी साईड गटार काढून पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी टाकळीभान यांच्या वतीने करण्यात आली आहे.

जे काही स्वयंघोषित नेते ग्रामपंचायत सदस्य नसतांना टाकळीभान घोगरगाव रस्त्याच्या चिखलामध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी करीत होते. ते सदस्य आता कुठे गेले? असा सवाल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Back to top button