बहादराबादला पाण्यासाठी 1.69 कोटी | पुढारी

बहादराबादला पाण्यासाठी 1.69 कोटी

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बहादराबाद गावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाणी योजनेसाठी 1 कोटी 69 लाख 896 रूपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली. या ई- निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सरपंच व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी दिली. दरम्यान, यासर्व कामांचा पाठपुरावा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केल्याचे पाचोरे यांनी सांगितले.

विक्रम पाचोरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, बहादराबादच्या दत्तवाडी, म्हसोबा वस्ती, कोपरगाव- संगमनेर रोडच्या वस्ती येथील रहिवाशांंना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. यासाठी गाव पातळीवर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक अनिता दिवे यांच्यामार्फत आवश्यक कागदपत्रांचा प्रस्ताव तयार केला. याबाबतचा पाठपुरावा तत्कालीन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केला. या 1 कोटी 69 लाख 896 रूपये प्रशासकीय खर्चास 22 एप्रिल 2022 रोजी मान्यता मिळवून दिली. या ई- निविदेची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. उपसरपंच संगीता अण्णासाहेब पाचोरे व सदस्यांचे याकामी सहकार्य लाभले, असे पाचोरे म्हणाले.

Back to top button