पारनेर : टाकळी ढोकेश्वर गटामध्ये पुन्हा झावरे-दाते यांची लढत? | पुढारी

पारनेर : टाकळी ढोकेश्वर गटामध्ये पुन्हा झावरे-दाते यांची लढत?

नगर, शशिकांत भालेकर : पारनेर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाले. मात्र, या आरक्षणामुळे काहींना लॉटरी लागली तर काहींच्या पदरी निराशा पडली. टाकळी ढोकेश्वर गटामध्ये शिवसेनेचे काशिनाथ दाते विद्यमान सदस्य आहेत. हा गट सर्वसाधारण झाल्यामुळे त्यांची जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याशी पुन्हा एकदा लढत होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकार्‍यांचा कार्यकाल कार्यकाल संपून चार महिने उलटले. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सुरु आहे. गट व गण निश्चित झाल्यानंतर गुरुवारी (दि.28) गट व गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षणानंतर अनेक गट व गणांत उलथापालत झाली असून, या आरक्षण सोडतीने राजकीय समीकरणे बदलले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच पाहिल्या जातात. त्या अनुषंगाने या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अनेक इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र, आरक्षण सोडतीनंतर काहींची अडचण झाली असून, काहींना मात्र आरक्षणाचा फायदा झाला आहे.

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप प्रमुख पक्ष असून, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या देखील अधिक आहे. जिल्हा परिषद सहा गटांमध्ये तिन्ही पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारीबाबत चाचणी केली. आमदार नीलेश लंके यांनी यापूर्वीच काही गटांचे उमेदवार जाहीर केले आहेत.

नवीन जवळा गट ओबीसीसाठी आरक्षित

ढवळपुरी गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. या गटात सुप्रिया झावरे या विद्यमान सदस्य आहेत. कान्हूर पठार जिल्हा परिषद गटात अ‍ॅड. आझाद ठुबे यांच्या पत्नी उज्ज्वला ठुबे या विद्यमान सदस्य आहेत. मात्र, आरक्षणामुळे हा गट पुन्हा एकदा ओबीसी महिला राखीव झाला असल्याने त्यांना संधी आहे. मात्र, शिवसेना-भाजप या पक्षांच्या वतीने या गटात उमेदवारांचा शोध सुरू आहे.

आमदार नीलेश लंके राष्ट्रवादीकडून निघोजमधून वसंत कवाद यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते. हा गट सर्वसाधारण झाला आहे. याच गटात जेणेकरून डॉ भास्कर शिरोळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जवळा हा जिल्हा परिषद गट नव्याने अस्तित्वात आला. गट ओबीसीसाठी आरक्षित झाला आहे. या गटातून शिवसेनेकडून विद्यमान सभापती गणेश शेळके पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे तर राष्ट्रवादीकडून माजी सभापती सुदाम पवार इच्छुक आहेत.

दादा शिंदे यांना लॉटरी

पंचायत समितीमध्ये अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले असून रांजणगाव गणामध्ये चर्चेत असणारे विक्रम कळमकर सतीश भालेकर यांना अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यामुळे निराशा झाली आहे. दादा शिंदे यांची मात्र, या गणात लॉटरी लागली असल्याचे बोलले जात आहे. सुपा गटामध्ये आमदार निलेश लंके यांचे वर्चस्व राहिले आहे मात्र तरीही भाजपकडून राहुल शिंदे हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. पंचायत समिती साठी सुपा गणातून सचिन पत्नी इच्छुक आहे. रांजणगाव मशिद या गणामधून अनेक जण इच्छुक होते. त्यामध्ये भाजपकडून राहुल शिंदे राष्ट्रवादी कडून विक्रम कळमकर सतीश भालेकर यांनी यापूर्वीच तयारी केली होती मात्र एस. सी.आरक्षण निघाल्याने सर्वांचे मनसूंबे धुळीस मिळाले आहेत

गण आरक्षण
  • ढवळपुरी – सर्वसाधारण
  • टाकळी ढोकेश्वर – सर्वसाधारण महिला
  • कान्हूरपठार-सर्वसाधारण महिला
  • वडझिरे-सर्वसाधारण महिला
  • आळकुटी-सर्वसाधारण
  • निघोज-सर्वसाधारण
  • जवळा-सर्वसाधारण महिला
  • वासुंदे- नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • वाडेगव्हाण-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • सुपा-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • रांजणगाव मशिद – अनुसूचित जाती
  • भाळवणी – अनुसूचित जमाती

Back to top button